AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Kaushal | विकी कौशलवर ही वेळ आली ? म्हणतो कृपया मला चित्रपटात घ्या, इन्स्टाग्राम पोस्टची एकच चर्चा

कलाकारांचे त्याने तोंडभरून कौतूक केले आहे. तसेच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद राय यांना त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी देण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे ही विनंती त्याने खासगीमध्ये न करता थेट सोशल मीडियावर केली आहे. त्याबाबतची एक पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केली आहे. विकीच्या याच विनंतीची आता पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Vicky Kaushal | विकी कौशलवर ही वेळ आली ? म्हणतो कृपया मला चित्रपटात घ्या, इन्स्टाग्राम पोस्टची एकच चर्चा
VICKY KAUSHAL
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 10:39 AM

Vicky Kaushal | प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कसदार अभिनय आणि आकर्षक शरीरयष्टी असल्यामुळे विकीचे देशात लाखो चाहते आहेत. सध्या मात्र तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद राय यांना त्यांच्या चित्रपटात काम देण्याची विनंती केली आहे.

विकी म्हणतो मला चित्रपटात काम द्या

विकी कौशलचे अभिनेत्री कतरिना कैफशी नुकतेच लग्न झाले. मागील अनेक दिवसांपासून या जोडीच्या लग्नाची चर्चा होती. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी तर सोशल मीडीयावर धुमाकूळ उडवून दिला होता. त्यानंतर आता विकी कौशल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने अतरंगी रे हा चित्रपट पाहून त्यावर प्रतिक्रिया दिलीय. या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचे त्याने तोंडभरून कौतूक केले आहे. तसेच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद राय यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी देण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे ही विनंती त्याने खासगीमध्ये न करता थेट सोशल मीडियावर केली आहे. त्याबाबतची एक पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केली आहे. विकीच्या याच विनंतीची आता चर्चा होत आहे.

anand rai and vicky kaushal

anand rai and vicky kaushal

विकी कौशल आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला ?

विकीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अतरंगी रे या चित्रपटाची वाहवा केली आहे. “अतरंगी रे हा चित्रपट खूप छान आहे. खूप छान वाटलं. सारा अली खानने चांगला अभिनय केला आहे. अभिनयासाठी कठीण असलेले पात्र तिने पडद्यावर साकारले आहे. धनुष तू जिनियस आहेस. अक्षय कुमार गुर्दा निकास दिया. आनंद राय सर मला तुमच्या आगामी चित्रपटात अभिनेता म्हणून संधी द्या,” असे विकीने आपल्या स्टोरीमध्ये म्हटले आहे. या पोस्टला आनंद राय यांनीदेखील अत्यंत मार्मिक पद्धतीने उत्तर दिले आहे. धन्यवाद भावा… तुला कास्ट करण्याची गरज नाही. तू जेव्हा कास्ट होशील तेव्हा खुद्द एका चित्रपटाची कथा असशील, असं आनंद राय यांनी म्हटलंय.

अतरंगी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला 

दरम्यान, अतरंगी रे हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष तसेच सारा अली खान यांनी मुख्य भूमिका केली आहे. हा चित्रपट प्रेक्षाकांना चांगलाच आवडला असून आतापर्यंत त्याने चांगलीच कमाई केली आहे.

इतर बातम्या :

Lal Singh Chaddha | हॉलिवूडचा अभिनेता Tom Hanks साठी ‘लाल सिंग चड्ढा’चे अमेरिकेत स्पेशल स्क्रीनिंग, चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार ?

Happy Birthday Farah Khan | कोणतेही प्रशिक्षण नाही, तरीही 5 फिल्मफेअर अवॉर्ड, जाणून घ्या कोरिओग्राफर फराह खान यांचं कर्तृत्व

India’s Best Dancer 2 Finale : इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 चा आज अल्टिमेट फिनाले; मिका सिंग, शिल्पा शेट्टी, धर्मेश खास पाहुणे, रंगत चढणार

पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.