Vicky Kaushal Birthday : लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करणार विकी कौशल, पत्नी कतरिना काय गिफ्ट देणार?

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या विकीला आज कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. डिसेंबर 2021 मध्ये विकी कौशलने सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचा विकीचा हा पहिला वाढदिवस आहे.

Vicky Kaushal Birthday : लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करणार विकी कौशल, पत्नी कतरिना काय गिफ्ट देणार?
विकी कौशल, कतरिना कैफImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 5:45 AM

मुंबई : ‘मसान’, ‘राजी’, आणि ‘उरी द सर्जिकल स्टाईक’ यांसारख्या चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या हृदयात घर केलेला अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) आज वाढदिवस आहे. त्याने खुप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या विकीने नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या विकीला आज कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. डिसेंबर 2021 मध्ये विकी कौशलने सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचा विकीचा हा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे कतरिना विकीला काय गिफ्ट देणार याची उत्सुकता या दोघांच्याही चाहत्यांना लागली आहे.

अभिनयाच्या जोरावर विकी कौशलचे वेगळे स्थान

विकी कौशलने ‘लव शव ते चिकन खुराना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र, ‘मसान’मुळेच त्याला खरी ओळख मिळाली. त्यावनंतर आलेल्या उरी-द-सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील विकीच्या अभिनयाला लोकांनी मनमुराद दाद दिली. 2016 मध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यानं सर्जिकल स्ट्राईकद्वारे घेतला होता. 2019 मध्ये त्यावर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर आला. या चित्रटाने तब्बल 200 कोटीपेक्षा अधिक कमाई केली. तसंच विकीचं अभियनातील स्थानही अढळ बनलं.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

या चित्रपटानंतर विकी कौशला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या चित्रपटात विकीने मेजर विहान सिंह शेरगिल यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात विकीसह अभिनेते परेश रावल, यामी गौतम, मोहित रैना आणि किर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत होते.

हे सुद्धा वाचा

विकीने नाकरला होता ‘उरी-द-सर्जिकल स्टाईक’!

महत्वाची बाब म्हणजे विकीने सुरुवातीला उरी-द-सर्जिकल स्टाईक हा चित्रपट नाकारला होता. तशी माहिती खुद्द विकीनेच एका मुलाखतीत दिली होती. मेजर विहान शेरगिल यांची भूमिका साकारण्यास त्याने नकार दिला होता. कारण तो या चित्रपटाशी कनेक्शनच बनवू शकत नव्हता. त्यानंतर विकीच्या वडिलांनी त्याला हा चित्रपट करण्यास तयार केलं. त्यानंतर तो म्हणाला की मी हा चित्रपट केला नसता तर ती माझी सर्वात मोठी चूक ठरली असती. मी अजून काही वेळ मागून घेतला, स्क्रिप्ट पुन्हा वाचली आणि मग हा चित्रपट करण्यासाठी मी उताविळ बनलो, असं विकी म्हणाला होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.