‘छावा’तील ‘त्या’ सीनमध्ये मुलीने स्वतःला जाळून घेतलं तेव्हा…, कोण आहे ‘ती’ मुलगी, जाणून व्हाल थक्क
'छावा' सिनेमाला सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. पण 'छावा' सिनेमातील 'तो' भयानक सीन, जेव्हा मुलीने स्वतःला घेतलं जाळून..., तिच्याबद्दल जाणून व्हाल थक्क, मुलगी सोशल मीडियावर कायम असते सक्रिय...

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 मध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात मोठे विक्रम रचले. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली. एवढंच नाही तर, ‘छावा’ सिनेमामुळे अनेक कलाकारांच्या करीयरला एक वेगळी दिशा मिळली आहे. ‘छावा’ सिनेमात अनेक नव्या कलाकारांना संधी मिळाली. तर प्रत्येक स्वतःची भूमिक उत्तमरित्या पार पाडली. सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे.
सिनेमात काही सीन असे आहेत, ज्यामुळे मन विचलित होतं. जर तुम्ही ‘छावा’ सिनेमा पाहिला असेल तर, तुम्हाला आठवत असेल की, बकऱ्या चरायला नेणारी मुलगी तुम्हाला आठवत असेल. जिला मुघल सेना स्वराज्याकडे येत असताना जिवंत जाळतात… सीन पाहिल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला.




सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या मुलीचं नाव साक्षी सकपाळ असं आहे. तिने सोशल मीडियावर सीनचा BTS व्हिडीओ देखील शेअर केला होता. जो पाहिल्यानंतर चाहते हैराण झाले. सीन शूट करताणा साक्षीला आग लावण्यात आली. पण सीन शूट करताना साक्षीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. व्हिडीओ आणि सिनेमातील सीन पाहिल्यानंतर चाहत्यांनी साक्षीचं कौतुक केलं.
View this post on Instagram
साक्षी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती मुंबईची असून एक स्टंट गर्ल आहे. शिवाय साक्षी डान्सर देखील आहे. साक्षीला वेगवेगळ्या प्रकारटे स्टंट करायला आवडतात. सोशल मीडियावन साक्षी हिची फ्लिप गर्ल अशी ओळख आहे. सोशल मीडियावर साक्षीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
साक्षीचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. ज्यावर साक्षी स्टंट करत व्हिडीओ अपलोड करत असते. सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमानंतर साक्षीच्या लोकप्रियतेते आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्याम माहितीनुसार, साक्षीने ‘छावा’ सिनेमासाठी ऑडिशन दिलं.
साक्षीच्या ‘छावा’ सिनेमातील सीनबद्दल सांगायचं झालं तर, सीनसाठी सिनेमाच्या टीम देखील मोठी मेहनत करावी लागली होती. साक्षीने साकारलेल्या भूमिकेला देखील प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. सोशल मीडियावर सिनेमातील अनेक सीन तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर साक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर साक्षीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर साक्षी हिचे 14.8K फॉलोअर्स आहेत. चाहते देखली साक्षीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.