शिवजयंतीला ‘छावा’ सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, 10 – 20 नाही इतक्या कोटींची कमाई
Chhaava Box Office: शिवजयंतीला 'छावा' सिनेमाला मिळलं चाहत्यांचं भरभरुन प्रेम, सगल 6 व्या दिवशी सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, अनेक हीट सिनेमांना मागे टाकत 'छावा' रचतोय इतिहास..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा...

Chhaava Box Office: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला दिसत आहे. सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून तुफान कमाई करताना दिसत आहे. ‘छावा’ सिनेमा विकी, रश्मिका आणि इतर कलाकारांसाठी फार महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारताना दिसत आहे. पण शिवजयंतीला प्रेक्षकांनी ‘छावा’ सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. सिनेमाने सहाव्या दिवशी म्हणजे शिवजयंतीला बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडलं आहेत.
सांगायचं झालं तर, सोमवारी ‘छावा’ सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावताना दिसला. पण मंगळवारी ‘छावा’ सिनेमाने कमाईने विक्रम रचलं आहे. कमाईचा आकडा पाहून विश्लेषक देखील चकित झाले आहे. ‘छावा’ सिनेमाने हीट सिनेमे ‘जवान’, ‘पठाण’, ‘पुष्पा’ यांसारख्या सिनेमांना देखील सहा दिवसांच्या कमाईत मागे टाकलं.
शिवजयंती असल्यामुळे अनेक चाहत्यांनी ‘छावा’ सिनेमा पाहण्याचं ठरवलं आणि सर्व थिएटर हाऊसफूल झाली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई 31 कोटी होती. त्यानंतर कमाई वेग मंदावला. पण शिवजंयतीला सिनेमाच्या कमाईचा ग्राफ चढत्या क्रमावर राहिला…
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 31कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 37 कोटी रुपयांचा कमाई केली. तिसऱ्या सिनेमाने 48.5 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली… तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावताना दिसला. चौथ्या दिवशी सिनेमाने 24 कोटी रुपये, तर पाचव्या दिवशी 25.25 रुपयांचा गल्ला जमा केला.
चौथ्या आणि पाचव्या दिवशी कमाईचा वेग मंदावल्यानंतर चाहत्यांना आणि निर्मात्यांना मोठा धक्का बसला. पण शिवजयंतीला सिनेमाने 10 – 20 कोटी नाही तर, तब्बल 32 कोटी रुपयांची कमाई केली. सांगायचं झालं तर, शिवजयंतीला प्रेक्षकांनी ‘छावा’ सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं.
सिनेमा सहा दिवसांत तब्बल 197.75 कोटींची कमाई केली आहे. सिनेमा लवकरच 200 कोटी रुपयांचा गल्ला पार करेल… अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘छावा’ ज्या वेगाने प्रगती करत आहे, ते पाहता लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.