वजन कमी करण्यासाठी 10-10 लिटर पाणी प्यायची ही अभिनेत्री; तरीही मिळाले अपयश, मग मात्र

मी अनेक वर्ष माझ्या शरीराचा तिरस्कार करत होते. वजन कमी करण्यासाठी मी अनेक उपाय केले, पण त्यात यश मिळाले नाही, असे अभिनेत्रीने सांगितले. मग मात्र मी..

वजन कमी करण्यासाठी 10-10 लिटर पाणी प्यायची ही अभिनेत्री; तरीही मिळाले अपयश, मग मात्र
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 12:05 PM

मुंबई : अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही तिच्या खणखणीत अभिनयासोबतच तिच्या स्पष्ट विचारांसाठीही प्रसिद्ध आहे. तिचं सुंदर हास्य आणि काळजाचा ठाव घेणारे डोळे, यासह तिच्या अभिनयाने ती रसिकांना खिळवून ठेवते. ती झिरो फिगर (size zero) कधीच नव्हती, पण तरीही तिला पडद्यावर पाहताना तिच्या प्लस साईज बॉडीकडे नव्हे तर तिच्या अदाकारीकडे, अभिनयाकडे लोकांच लक्ष जातं. झिरो साईज नसली तरी ती तिचं काम इतक चोखं करते, की कोणाला बोट ठेवायला जागाच मिळू नये.

मात्र असं असलं तरी तिनेही बराच संघर्ष केला आहे. एक काळ असा होता, जेव्हा मी माझ्या शरीरामुळे अतिशय त्रस्त झाले होते, असं विद्या सांगते. मी माझ्या शरीरासोबतच ( ते जसं आहे तसं) जगणं शिकले होते. त्यत काहीच बदल होणार नाही अशी ठाम समजूत मी करून घेतली होती.

माझ्या शरीराची लाज वाटायची…

माझ्या आईला जसं हवं होतं तसं माझं शरीर नव्हतं. मी त्यामुळे त्रासले होते. काही वेळा तर मला माझ्याच शरीराची लाज वाटायची, अस विद्याने नमूद केलं. मी बराच काळ या मन:स्थितीत होते आणि माझा स्वत:शीच संघर्ष सुरू होता. एक काळ तर असा होता, जेव्हा मी माझ्याच शरीराचा तिरस्कार करायला लागले होते.

मी बऱ्याच वेला आजारी पडायचे. पण त्याचं कारण म्हणजे मी माझं शरीरा स्वीकारूच शकत नव्हते. पण त्यानंतर मला उमगलं की जर हे शरीर नसतं तर मी जिवंतच राहू शकले नसते. मी अनेक वर्ष शरीराचा तिरस्कार केला, त्याचा आता मला खूप पश्चाताप होतो, असही विद्याने नमूद केलं.

पाणी पिऊन केला वजन घटवण्याचा प्रयत्न

एका जुन्या मुलाखतीत विद्याने सांगितलं होतं की तिने वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. वजन कमी करायचे असेल तर १० लि लिटर पाणी प्यायला हवं, असा सल्ला मला कोणीतरी दिला आणि मी तो फॉलोही केला. मी भरपूर पाणी प्यायला लागले, पण त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मी बारीक काही झाले नाही, पण खूप पाणी प्यायल्याने आजारीच पडले, इतकी, की मला रुग्णालयातच दाखल करावं लागलं.

मात्र मी त्यातून धडा शिकले. माझं शरीर जसं आहे, तसं स्वीकारायला शिकले. कारण हे शरीर नसतं तर मीच नसते, नाही का ? असं विद्या म्हणाली

कामाबाबत बोलायचं झालं तर विद्या लवकरच नियत या मिस्ट्री थ्रिलरमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राहुल बोस, राम कपूर यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.