‘आपण एकत्र हसलो, गुपचूप रडलो…’, विजय देवरकोंडा असं का म्हणाला?
जुन्या गोष्टी आठवत विजय देवरकोंडने भावना केल्या व्यक्त; प्रत्येकाने २०२२ मध्ये अनुभवले असतील असे क्षण

Vijay Deverakonda : प्रत्येकाने सरत्या वर्षाचे आभार मानत, नव्या वर्षाच नव्या उमेदीने स्वागत केलं. अनेक सेलिब्रिटींनी इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये भावना व्यक्त केल्या. अभिनेता विजय देवकोंडाने देखील स्वतःचा एक खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विजय फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये जुन्या क्षणांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. अभिनेत्याने पोस्ट पाहून तुमच्या देखील काही आठवणी नक्की ताज्या होतील.
खास फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘एक वर्ष जे काही क्षणांसाठी कायम खास राहिल… जेव्हा आपण एकत्र हासलो, गुपचूप रडलो, स्वप्नाचा पाठलाग केला, काही गोष्टी जिंकलो, तर काही गमावलं…. सर्व क्षण साजरा करण्याची गरज आहे… कारण हे आयुष्य आहे…’ असं खास कॅप्शन अभिनेत्याने लिहिलं.
View this post on Instagram
सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा असं देखील अभिनेता पोस्टच्या शेवटी म्हणाला. महत्त्वाचं म्हणजे विजय कायम त्याच्या अभिनय आणि फिटनेसमुळे तर चर्चेत असतोच, पण अभिनेता अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असतो. दरम्यान रश्मिकाने देखील नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत खास पोस्ट शेअर केली आहे.
एक फोटो पोस्ट करत रश्मिकाने कॅप्शनमध्ये, ‘Hello 2023…’ असं लिहिलं आहे. विजय आणि रश्मिकाने सुट्ट्यांचा आनंद घेताना फोटो पोस्ट केल्यामुळे दोघे एकत्र असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. दोघांच्या फोटोंवर अनेक कमेंट येत आहेत. ज्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चा रंगल्या आहेत. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील दोघांची जोडी प्रचंड आवडते. पण दोघे कधी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर करतील? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.