Pahalgam Terror Attack: विजय देवरकोंडा संताप व्यक्त करत म्हणाला, ‘पाकिस्तानी लोकांना सर्वात आधी…’
Pahalgam Terror Attack: पाकिस्तान देशाची अवस्था आणि पाकिस्तानी लोकांबद्दल विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया, संताप व्यक्त करत अभिनेता म्हणाला, 'पाकिस्तानी लोकांना सर्वात आधी...', सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा...

Pahalgam Terror Attack: दक्षिणेतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते विजय देवरकोंडा याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद्यांवर संताप व्यक्त करताना अभिनेत्याने पाकिस्तानचाही उल्लेख केला. एवढंच नाही तर विजयने लोकांना आवाहन केलं की काश्मीर आमचा आहे आणि आम्हाला यावर आम्हाला कोणतीच शंका नाही. सध्या सर्वत्र विजय याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, विजय कायम त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.
विजय देवरकोंडा नुकताच एका कार्यक्रमादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना दिसला. विजय याने हल्ल्यात ठार झालेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. यासोबतच, पाकिस्तानातील लोकांना लक्ष्य करताना विजय म्हणाला, पाकिस्तानातील लोकांना चांगलं शिक्षण आवश्यक आहे जेणेकरून ते योग्य आणि अयोग्य यामधील फरक समजू शकतील. ज्यामुळे कोणताही दहशतवादी त्यांचं ब्रेनवॉश करू शकणार नाही.
पुढे विजय म्हणाला, ‘काश्मीरमध्ये ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत. त्या सहन करण्यापलिकडे आहे. या लोकांना शिक्षण आणि ज्ञानाची खूप गरज आहे. त्यांना वीज आणि आवश्यक सुविधांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत तरीही ते काश्मीरसाठी लढत राहतात, जे त्यांचं नाहीच. त्यांनी देशातील जनतेला सांगितलं की काश्मीर त्यांचा आहे. त्याबद्दल किंचितही शंका घेण्यास वाव नाही. काश्मीर आपल्या देशाचा एक भाग आहे…’ सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.




जम्मू काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. फिरायला गेलेल्या भारतीयांनी स्वतःचे प्राण गमावल्यामुळे देशात सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. देशात संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्यात 26 जणांनी प्राण गमावले आहेत. तर अनेक जण जखमी आहे.