तमन्ना भटिया – विजय वर्मा रिलेशनशिपमध्ये ? नात्याच्या चर्चा रंगत असताना अभिनेता असं काय म्हणाला
बॉलिवूडच्या नव्या कपलकडे सर्वांच्या नजरा; तमन्ना भटिया हिच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना विजय वर्मा असं काय म्हणाला ज्यामुळे...
मुंबई : झगमगत्या विश्वात कायम चर्चाचे विषय असतो, तो म्हणजे सेलिब्रिटींचे एकमेकांसोबत असलेले खास कनेक्शन. बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या अभिनेत्री नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जाईल काही सांगता येत नाही. आता देखील अशा दोन सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत ज्यावर चाहत्यांचा विश्वास देखील बसणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्यात खास नातं असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगत असताना विजय वर्माच्या एका कमेंटमुळे अभिनेता पुन्हा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
विजय वर्मासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना तमन्नाने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘सुंदर ड्रेस, सुंदर जागा ज्यामुळे सुंदर फोटो तयार होतात…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. तमन्नाच्या फोटोवर विजय वर्माने देखील कमेंट केली आहे. विजय याने तमन्नाच्या फोटोवर कमेंट केल्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
दरम्यान, तमन्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील विजयने अभिनेत्रीसोबत वेळ व्यतीत केला. २१ डिसेंबर रोजी अभिनेत्रीने मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला. पण तमन्ना आणि विजय त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
तमन्ना आणि विजय यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर विजय लवकरच बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर तमन्ना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत ‘बोल चुडिया’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.