इंटिमेट सीनमध्ये विनोद खन्ना यांनी माधुरी दीक्षित हिच्यासोबत असं कायं केलं? ज्यामुळे अभिनेत्री आजही म्हणते…
20 वर्ष लहान माधुरी दीक्षित हिच्यासोबत इंटिमेट सीनमध्ये विनोद खन्ना यांनी केलेलं कृत्य आजही चर्चेत; अभिनेत्री 'ती' घटना आजही विसरु शकलेली नाही...
मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत ज्यामधील इंटिमेट सीनमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. फार पूर्वीपासून इंटिमेट सीन मोठ्या पडद्यावर प्रसारित करण्यात येतात. इंटिमेट सीन करताना अनेकदा अभिनेत्री आणि अभिनेत्यांना देखील संकोचल्या सारखं वाटायचं. पण अनेकदा इंटिमेट सीन करताना अभिनेत्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्यानंतर झालेल्या घटनांमुळे सर्वत्र तुफान चर्चा रंगल्या. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेते विनोद खन्ना यांच्या ‘दयावान’ सिनेमातील एक सीन आजही तुफान चर्चेत आहे.
१९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ सिनेमात अभिनेते विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा एक किसिंग सिन होता. सीन शूट करत असतात विनोद खन्ना यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. तेव्हा माधुरी फक्त आणि फक्त २० वर्षांची होती.
शुटिंग दरम्यान विनोद खन्ना यांनी केलेल्या या कृत्यामुळे माधुरीला आजही पश्चाताप होतो. शुटिंग दरम्यान माधुरीला प्रचंड संकोचल्यासारखं वाटलं होतं. विनोद खन्ना माधुरीपेक्षा तब्बल २० वर्ष मोठे होते. म्हणून अनेकदा विचार करून विनोद खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन करण्यासाठी माधुरी तयार झाली.
एवढंच नाही तर, दिग्दर्शकांकडे किसिंग सीन कट करण्याची मागणी देखील माधुरीने केली. पण माधुरी इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्यामुळे दिग्दर्शकांनी तिची एकही गोष्ट ऐकली नाही. जेव्हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या सीनमुळे अनेक चर्चा रंगल्या.
विनोद खन्ना यांच्यासोबत चित्रीत केलेला किसिंग सीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होवू नये म्हणून माधुरी यांनी अनेक प्रयत्न केले. जेव्हा विनोद खन्ना यांना स्वतःच्या चुकुची जाणीव झाली तेव्हा त्यांनी माधुरीची माफी देखील मागितली. ‘दयावान’ सिनेमात विनोख खन्ना यांच्यासोबत दिलेल्या किसिंग सिनचा माधुरीला आजही पश्चाताप होतो. जेव्हा खुद्द माधुरीने या घटनेबद्दल सांगितलं, तेव्हा देखील तिला पश्चाताप होत होता.
आज माधूरी दीक्षित बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र माधुरीच्या नावाची चर्चा होती. एवढंच नाही तर, आता बॉलिवूडपासून दूर असलेली माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. माधुरी फक्त अभिनेत्री नसून कथक डान्सर देखील आहे. अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.