किशोर कुमार यांच्या बंगल्यात विराट कोहलीचा रेस्टॉरंट; पहा Video

विराट कोहली पुरवणार खवय्यांचे जीभेचे चोचले

किशोर कुमार यांच्या बंगल्यात विराट कोहलीचा रेस्टॉरंट; पहा Video
विराट कोहलीचं रेस्टॉरंटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 5:41 PM

मुंबई- विराट कोहली (Virat Kohli) हा उत्तम क्रिकेटर आहेच, पण त्याचसोबत तो खवय्यासुद्धा आहे. दिल्लीच्या लोकांना खाण्यावर विशेष प्रेम असतं. याच प्रेमाला विराटने आता वेगळं रुप दिलं आहे. विराटचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो एका रेस्टॉरंटबद्दल बोलताना दिसत आहे. हा रेस्टॉरंट विराटचाच आहे. मुंबईत (Mumbai) विराटच्या या नव्या रेस्टॉरंटचं उद्घाटन लवकरच होणार आहे. याचविषयी माहिती देण्यासाठी त्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

मुंबईतील ‘वन8 कम्युन’ या रेस्टॉरंटची एक झलक विराटने या व्हिडीओतून चाहत्यांना दाखवली. यासाठी त्याने दिवंगत गायक किशोर कुमार यांचा ‘गौरी कुंज’ हा बंगला घेतला होता. याच बंगल्याला त्याने आता रेस्टॉरंटचं रुप दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये विराटसोबत प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि अभिनेता मनिष पॉलसुद्धा पहायला मिळतोय. हे दोघं मिळून या रेस्टॉरंटची झलक चाहत्यांना दाखवत आहेत. ‘इथलं जेवण हेच या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य असेल’, असं विराट मनिषला सांगताना दिसतोय. खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवण्याचा हरएक प्रयत्न या रेस्टॉरंटमधील शेफकडून केला जाणार आहे.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

“ज्या बंगल्यात मी रेस्टॉरंटचं उद्घाटन करणार आहे, त्यात किशोर कुमार यांच्या अनेक आठवणी आहेत. याच बंगल्यात ते राहायचे. या बंगला खूपच सुंदर आहे आणि त्यात आम्ही आणखी काही नव्या गोष्टींची भर घातली आहे. इथे येणाऱ्या लोकांना बंगल्याचं नवीन रुप नक्कीच आवडेल”, असं विराट मनिषला सांगतो.

किशोर कुमार हे हिंदी चित्रपट आणि संगीतसृष्टीतील मोठं नाव आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 100 हून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत 2678 गाणी गायली आहेत. तर 88 चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेता म्हणून काम केलं आहे. 13 ऑक्टोबर 1987 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.