बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा, अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीबद्दल हैराण करणारी कमेंट, अनिल कपूर…
बिग बॉस ओटीटी 3 धमाका करताना दिसत आहे. अरमान मलिक हा बिग बॉसमध्ये आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला होता. मात्र, पायल मलिक ही बिग बॉसमधून बाहेर पडलीये. आता नुकताच बिग बॉसच्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. हेच नाहीतर अरमान मलिकने विशालच्या कानाखाली मारलीये.
बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाका होताना दिसतोय. घरात जोरदार हंगामा बघायला मिळतोय. बिग बॉसमध्ये अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला. मात्र, पायल ही बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडलीये. विकेंडच्या वारमध्ये मोठा धमाका झालाय. हेच नाहीतर रागाच्या भरात अरमान मलिक हा थेट घरातील एकदा सदस्याच्या कानाखाली मारतो. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिच्याबद्दल वाईट भाष्य विशाल करतो. याबद्दलच पायल मलिक ही बिग बॉसच्या स्टेजवर येत खुलासा करते. यानंतर अनिल कपूर विशाल पांडेचा चांगलाच क्लास लावतात.
विशाल पांडे हा कटारिया याच्या कानामध्ये म्हणतो की, मला भाभी (कृतिका मलिक) आवडत आहे. हे ऐकून कटारिया देखील विशालवर भडकताना दिसला. आता विकेंडच्या वारमध्ये पायल मलिक ही विशालला म्हणते की, तू जिच्याबद्दल हे बोलला ती एका मुलाची आई आणि कोणाची तरी पत्नी आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. कृतिका आणि अरमान यांना देखील हे ऐकून धक्का बसतो.
यावर अरमान मलिक हा म्हणतो की, पायल यावरून समजते की, या लोकांने विचार किती छोटे आहेत. यानंतर विशाल म्हणतो की, मी माझ्या मम्मीची शपथ घेऊन सांगतो की, मी चुकीच्या अॅंगलने हे बोललो नव्हतो. यावर अनिल कपूर म्हणतात की, जर मग तू हे चुकीच्या याने बोलला नव्हता तर मग तू कटारियाच्या कानामध्ये हे का बोलला?
यानंतर अरमान मलिक हा थेट विशाल याच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो की, कृतिकाबद्दल जे बोलला आहेस तू कमीत कमी हे तरी लक्षात घ्यायला हवे की, ती एका मुलाची आई आहे. यावेळी विशाल आणि अरमान यांच्यातील वाद वाढतो आणि थेट अरमान मलिक हा विशाल याच्या कानाखाली मारतो. यानंतर घरातील इतर सदस्य हे दोघांना थांबवताना दिसत आहेत.
अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यातील वाद चांगलाच वाढताना दिसतोय. लोक देखील विशाल याच्यावर टीका करताना दिसत आहेत. मुळात म्हणजे कृतिका मलिकच नाहीतर कोणत्याही महिलेबद्दल असे बोलणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आले. आता विशालच्या कानाखाली मारल्यामुळे अरमान मलिक याला काय शिक्षा मिळते, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.