Vivek Oberoi : ऐश्वर्याला विवेक ओबेरॉयचा अप्रत्यक्ष टोमणा; म्हणाला “मी कधीच कमिटमेंट देऊन..”

विवेक आणि ऐश्वर्या यांचं 2005 मध्ये ब्रेकअप झालं. ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड अर्थात सलमान खान याने धमकी दिल्याचा खुलासा त्याने नंतर केला होता. इतकंच नव्हे तर सलमानने माझं करिअर उद्ध्वस्त केलं, असाही आरोप विवेकने केला होता.

Vivek Oberoi : ऐश्वर्याला विवेक ओबेरॉयचा अप्रत्यक्ष टोमणा; म्हणाला मी कधीच कमिटमेंट देऊन..
Aishwarya Rai and Vivek OberoiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 12:45 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं अफेअर जगजाहीर होतं. या दोघांचं अफेअर जितकं चर्चेत होतं, त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली. विविध मुलाखतींमध्ये विवेक याविषयी अनेकदा व्यक्त झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक त्याच्या भूतकाळातील रिलेशनशिप्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. विवेकने ऑक्टोबर 2010 मध्ये कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची कन्या प्रियांका अल्वाशी लग्न केलं. लग्नापूर्वी विवेक केवळ ऐश्वर्यासोबतच नाही तर इतरही काही जणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र ब्रेकअपनंतर त्यांच्याशी चांगली मैत्री जपल्याचं विवेकने या मुलाखतीत सांगितलं. इतकंच नव्हे तर लग्नात माझ्या एक्स गर्लफ्रेंड्सनीही हजेरी लावली होती, असंही तो म्हणाला. या मुलाखतीत विवेकने अप्रत्यक्षरित्या ऐश्वर्याला टोमणासुद्धा लगावला.

“तो माझ्या अहंकारासाठी मोठा धक्का होता. पण मी कधीच अप्रामाणिक नव्हतो. मी एखादीला नात्यात वचन देऊन सहज सोडणारा नाही. त्यापेक्षा मी स्पष्ट त्यांना सांगेन की मला सध्या गंभीर रिलेशनशिप नकोय. मी माझ्या बऱ्याच कॅज्युअल गर्लफ्रेंड्ससोबत ब्रेकअपनंतरही मित्र म्हणून राहिलो. त्यांच्यापैकी बऱ्याच जणी माझ्या लग्नालाही आल्या होत्या. प्रत्येक नातं तुम्हाला काहीतरी शिकवतं, तुमच्यासोबत ते नातं एखादी गोष्ट सोडून जातं. अत्यंत वाईट ब्रेकअप आणि विषारी नातेसंबंध तुम्हाला तुमचे पॅटर्न्स शिकवतात. तुम्ही कशापासून दूर राहिलं पाहिजे, हे ते शिकवतात”, असं विवेक म्हणाला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

विवेक ओबेरॉयने राम गोपाल वर्माच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. चित्रपटांमध्ये काम करताना तो ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला. मात्र ऐश्वर्याचं सलमान खानसोबतचं भूतकाळातील नातं हे विवेकसाठी त्रासदायक ठरलं होतं. विवेक आणि ऐश्वर्याने ‘क्यूँ हो गया ना’ या चित्रपटात काम केलं होतं. सलमानपासून दूर झालेली ऐश्वर्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विवेकच्या जवळ आली होती. या दोघांच्या अफेअरची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत होती. मात्र अचानक एकदा विवेकने सर्वांसमोर येऊन खुलासा केला की सलमान त्याला धमक्या देत आहे. अखेर ऐश्वर्यासोबतचं त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. 2005 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.

2010 मध्ये विवेकने प्रियांकाशी लग्न केलं. हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या दोघांना वियान वीर ओबेरॉय हा मुलगा आणि अमेया निर्वाणा ओबेरॉय ही मुलगी आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.