AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhello Show: भारताकडून ऑस्करला पाठवल्या गेलेल्या ‘छेल्लो शो’ची कथा काय?

'छेल्लो शो'मध्ये असं काय आहे खास? RRR, द काश्मीर फाईल्सला मागे टाकत पोहोचलं ऑस्करला

Chhello Show: भारताकडून ऑस्करला पाठवल्या गेलेल्या 'छेल्लो शो'ची कथा काय?
Chhello ShowImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 7:18 PM

दिग्दर्शक पान नलिन (Pan Nalin) यांचा गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा यंदाच्या ऑस्करसाठी भारताकडून अधिकृतपणे पाठवण्यात आला आहे. ऑस्करच्या (Oscar) परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीसाठी भारताकडून या चित्रपटाची निवड करण्यात आली. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या सरचिटणीस सुपर्णा सेन यांनी मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली. प्रख्यात कन्नड चित्रपट दिग्दर्शक टीएस नागभरणा यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षकांनी ‘छेल्लो शो’ या चित्रपटाची निवड केली. ‘छेल्लो शो’चा वर्ल्ड प्रीमियर न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. हा चित्रपट भारतात 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

आपल्या चित्रपटाला अधिकृतरीत्या ऑस्करसाठी पाठवल्याबद्दल पान नलिन यांनी ट्विट केलं, “आजची रात्र खास आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि ज्युरींचे आभार. ‘छेल्लो शो’ या माझ्या चित्रपटावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.”

छेल्लो शोचा अर्थ काय?

छेल्लो हा गुजराती शब्द आहे ज्याचा अर्थ शेवटचा असा होतो. छेल्लो शो म्हणजे शेवटचा शो. या चित्रपटाची कथा ही नऊ वर्षांच्या समय नावाच्या मुलाची आहे. समय हा सिनेमाच्या जादुई विश्वाकडे आकर्षित होतो. सौराष्ट्रातील चलाला गावातील या कथेत समय त्याच्या वडिलांसोबत रेल्वे स्टेशनवर चहाच्या स्टॉलवर काम करतो. हे असं रेल्वे स्थानक आहे जिथे मोजक्याच गाड्या थांबतात, त्यामुळे त्याचं कुटुंब आर्थिक विवंचनेशी झुंजत असतं.

हे सुद्धा वाचा

समयचं अभ्यासात फारसं मन लागत नाही. तो एकदा आपल्या कुटुंबासोबत चित्रपट पाहायला जातो आणि इथूनच त्याची थिएटर आणि चित्रपटप्रती असलेली आवड वाढते. इथे तो प्रोजेक्टर ऑपरेटर फैजलला भेटतो.

समयची आई चांगला स्वयंपाक करते. समय तिचं जेवण फैजलला खायला देतो आणि त्या बदल्यात तो समयला प्रोजेक्टर रूममधून चित्रपट बघायला देतो. ही प्रोजेक्टर रूमच समयची पहिली सिनेमा शाळा ठरते.

आपल्या मुलाने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून कुटुंबाची आर्थिक चणचण दूर करावी, अशी समयच्या वडिलांची (दीपेन रावल) इच्छा असते. पण वयाच्या नवव्या वर्षी समय शाळा सोडतो आणि प्रोजेक्टर रूममधून सिनेमे पाहतो. सिनेमाबद्दलच्या प्रेमापोटी तो विविध जुगाड करत स्वत: प्रोजेक्टर बनवतो.

चित्रपटसृष्टीचं बदलतं चित्र या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. भारतातील सिनेमा सेल्युलॉइड म्हणजेच पारंपारिक रीलमधून डिजिटल कसा झाला आणि देशातून सिंगल स्क्रीन थिएटर्स कशी गायब होत आहेत, त्यांची जागा मल्टीप्लेक्सने घेतली आहे, हे पहायला मिलतं. चित्रपटाचे दिग्दर्शक नलिन यांच्या म्हणण्यानुसार छेल्लो शो हा चित्रपट काहीसा त्यांच्या जीवनावर आधारित आहे.

छेल्लो शोची तुलना 1998 चा इटालियन चित्रपट ‘सिनेमा पॅराडिसो’शी केली जात आहे. ज्यामध्ये आठ वर्षांचा सॅल्वाटोर हा सिनेमा पॅराडिसो नावाच्या थिएटरमध्ये आपला सर्व वेळ घालवतो. अल्फ्रेडो नावाचा प्रोजेक्टर ऑपरेटर त्याला ऑपरेटरच्या बूथमधून चित्रपट दाखवतो. त्या बदल्यात सॅल्वाटोर हा ऑपरेटरला छोट्यामोठ्या कामात मदत करतो.

कोण आहेत दिग्दर्शक पान नलिन?

पान नलिन हे पुरस्कार विजेते चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘संसार’, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’, ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ आणि ‘आयुर्वेद: द आर्ट ऑफ बिइंग’सारखे चित्रपट केले आहेत. पान नलिन यांनी सिनेमाचं प्रशिक्षण घेतलं नाही. ही कला त्यांनी स्वतःहून आत्मसात केली. अहमदाबादच्या नॅशनल स्कूल ऑफ डिझाईनमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं.

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “हा चित्रपट म्हणजे भारताचा आत्मा आहे. ही कथा एका अशा मुलाची आहे ज्याला सिनेमाच्या जगात काहीतरी मोठं करायचं आहे आणि त्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही.” हा चित्रपट बनवण्यासाठी पान नलिन यांना साडेतीन वर्षे लागली.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.