Rhea Chakraborty | तुरुंगात रिया चक्रवर्ती हिच्यासोबत काय व्हायचं? शेवटच्या क्षणी घडलेली ‘ती’ घटना म्हणजे…

Rhea Chakraborty | तुरुंगात रिया चक्रवर्ती हिने काढले २८ दिवस, 'त्या' दिवसांमध्ये अभिनेत्रीसोबत काय झालं? जामीन मिळाल्यानंतर इतर इतर कैदी महिलांनी अभिनेत्रीसोबत काय केलं? अनेक वर्षांनंतर रिया चक्रवर्ती हिने सांगितलं कसे होते आयुष्यातील वाईट दिवस..

Rhea Chakraborty | तुरुंगात रिया चक्रवर्ती हिच्यासोबत काय व्हायचं? शेवटच्या क्षणी घडलेली 'ती' घटना म्हणजे...
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 10:39 AM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला अनेक वर्ष झाली असली तरी, अभिनेत्याला कोणी विसरु शकलेलं नाही. आजही सोशल मीडियावर अभिनेत्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. अभिनेत्याच्या निधनानंतर अनेकांनी अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला जबाबदार ठरवलं आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला तुरुंगात देखील जावं लागलं. अभिनेत्याच्या निधनानंतर रिया एक दोन नाही तर, तब्बल २८ दिवस तुरुंगात होती. नुकताच झालेल्या मुलाखतीत तुरुंगात नक्की काय घडलं यावर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र रिया चक्रवर्ती हिची चर्चा रंगत आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘तुरुंगात राहणं सोपं नाही. तुम्हाला सोसायटी, समाजापासून लांब रााहावं लागतं. तुरुंगातील विश्व फार वेगळं आहे. तुम्हाला एक नंबर दिला जातो आणि तोच नंबत तुमची ओळख असतो.. तुम्हाला सर्वकाही सांगितलं जातं, कुठे राहायचं आहे. कोणत्या वेळी काय खायचं आहे. तुरुंगात मला असं वाटलं सर्व काही संपलं आहे.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तुरुंगातील महिलांना पाहिलं तेव्हा कळलं आनंद काय असतो. एक समोसा जरी तुरुंगात वाटण्यात आला तर, तो आनंद फार वेगळा असतो.. एक समोस्यामुळे त्यांच्या डोळ्यातील आनंद सुखावणारा होता. आपण अनेक गोष्टी मिळाल्या म्हणून आपला जीव तुटतो, तिकडे एक समोसा मिळाला म्हणून त्या महिला आनंदी असतात…’

तुरुंगातील महिलांनी रिया हिने दिलं वचन

अभिनेत्री म्हणाली, ‘मी तुरुंगातील महिलांना वचन दिलं होतं. मला जामीन मिळाल्यानंतर मी नागिन डान्स करेल. पण जेव्हा मला जामीन मिळाला तेव्हा माझ्या भावाला जामीन मिळाला नव्हता. मी जेव्हा तुरुंगातून बाहेर येत होती, तेव्हा मला जेलर राहूदे असं म्हणाली. पण मला त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता..’

‘जामीन मिळाल्यानंतर अखेर मी नागिन डान्स केला. पुन्हा कधी तुरुंगातील महिलांना भेटेल मला माहिती नव्हतं. म्हणून मला त्याना दुःखवायचं नव्हतं.. तेव्हा सर्व महिलांनी माझ्यासोबत मनसोक्त डान्स केला…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिया हिची चर्चा रंगली आहे.

रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील रिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.