ऐश्वर्या रायला ‘प्लास्टिक’ म्हणणाऱ्यांना अभिषेकचं सडेतोड उत्तर; म्हणाला..

ऐश्वर्या रायला 'प्लास्टिक' म्हणून हिणवणाऱ्यांना अभिषेकने एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं. यावेळी त्याने ऐश्वर्याच्या काही दमदार चित्रपटांची उदाहरणं दिली. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत.

ऐश्वर्या रायला 'प्लास्टिक' म्हणणाऱ्यांना अभिषेकचं सडेतोड उत्तर; म्हणाला..
Abhishek Bachchan and aishwarya rai
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 8:48 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने केवळ तिच्या सौंदर्यानेच नाही तर दमदार अभिनयकौशल्यानेही असंख्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी 1994 मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. करिअरमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारूनही ऐश्वर्याला अनेकदा ठराविक टीकांचा सामना करावा लागला. तरी ऐश्वर्याने या टीकेवर नेहमीच प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मात्र तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन याने पत्नीला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं होतं. ऐश्वर्याला प्लास्टिक म्हणणाऱ्यांना त्याने सडेतोड उत्तर दिलं होतं.

“तुम्ही खरंच पाहिलंत तर… आणि आता मी एक पती म्हणून बोलत नाहीये तर एक सहकलाकार आणि एक अभिनेता म्हणून बोलतोय.. तिने तिच्या करिअरमध्ये बऱ्याच धाडसी भूमिका साकारल्या आहेत. ती तिच्या सौंदर्यासाठी सर्वाधिक ओळखली जाते, मग त्याला साजेशाच भूमिका ती साकारू शकली असती. तरीही तिने आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत”, असं अभिषेक ‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता. यावेळी त्याने ऐश्वर्याच्या अशा काही भूमिकांची उदाहरणंही दिली. त्यात त्याने दिग्दर्शक जग मुंध्रा यांच्या ‘प्रोवोक्ड’, रितूपर्णो घोषण यांच्या ‘चोखर बाली’ आणि ‘रेनकोट’, मणि रत्नम यांच्या ‘गुरू’ या चित्रपटांचा उल्लेख केला. ऐश्वर्याबद्दल बोलताना तिच्या प्रतिभेचंही कौतुक करा, असं अभिषेक म्हणाला होता.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. 2009 मध्ये तिला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्याही जोरदार चर्चा आहेत. 17 वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र या चर्चांवर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात जेव्हा दोघं वेगवेगळे आले, तेव्हा घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. या लग्नात अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत आला होता, तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या दोघीच नंतर आल्या होत्या.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.