भर मुलाखतीत अचानक ऐश्वर्याने अभिषेककडे मागितला किस अन्..

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी हॉलिवूड अँकर ओप्रा विन्फ्रेला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने अभिषेककडे किसची मागणी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

भर मुलाखतीत अचानक ऐश्वर्याने अभिषेककडे मागितला किस अन्..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan (1)Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 12:13 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. 2007 मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि त्यांना आराध्या ही मुलगी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बऱ्याच काळापासून एकत्र न दिसल्याने या चर्चांना उधाण आलंय. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यालाही दोघं वेगवेगळे पोहोचले होते. त्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. या चर्चांदरम्यान अभिषेकच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ समोर आला होता. त्यात तो साखरपुड्याची अंगठी दाखवत अजूनही विवाहित असल्याचं म्हणताना दिसला होता. आता ऐश्वर्याच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2009 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघं हॉलिवूडमधील प्रसिद्ध अँकर ओप्रा विन्फ्रेच्या प्रसिद्ध ‘द ओप्रा विन्फ्रे शो’मध्ये पोहोचले होते. या मुलाखतीत ओप्राने ऐश्वर्या आणि अभिषेकचा बरेच प्रश्न विचारले होते. मुलाखतीदरम्यान ओप्रा ऐश्वर्याला विचारते की तुम्ही दोघांनी कधी ऑन कॅमेरा एकमेकांना किस केलं नाही का? हे ऐकताच ऐश्वर्या भर मुलाखतीत अभिषेककडे किसची मागणी करते. हे पाहून अँकरसह उपस्थित प्रेक्षकसुद्धा थक्क होतात.

हे सुद्धा वाचा

ओप्राचं प्रश्न ऐकून ऐश्वर्या थेट अभिषेकसमोर तिचं गाल पुढे करते आणि म्हणते ‘मला किस कर’. तेव्हा अभिषेकसुद्धा ऐश्वर्याच्या गालावर किस करतो. यानंतर ऐश्वर्या हसू लागते आणि अँकरला म्हणते ‘पाहिलंत का तुम्ही?’ ऐश्वर्या आणि अभिषेकच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. तर ऑन कॅमेरा कधी एकमेकांना किस न केल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अभिषेक पुढे म्हणाला, “भारतातील लोक असं मानतात की प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वासमोर किस करण्याची गरज नाही. आम्हीसुद्धा हेच मानतो आणि आमच्या संस्कृतीचा आदर करतो.” अभिषेकच्या या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली होती.

बॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकने वेगवेगळी एण्ट्री केली होती. एकीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नंदा, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र आले होते. तर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या हे नंतर आले. किमान अभिषेकने तरी त्या दोघींसोबत यायला हवं होतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते. बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्यात नक्कीच काही आलबेल नाही, अशाही चर्चा होत्या.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.