अजय देवगणने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यास दिला होता नकार? अखेर किंग खानची प्रतिक्रिया समोर

काजोल आणि अजयने लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. 'इश्क', 'प्यार तो होना ही था' यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. बऱ्याच वर्षांनंतर 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला.

अजय देवगणने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यास दिला होता नकार? अखेर किंग खानची प्रतिक्रिया समोर
Kajol, Ajay and Shah RukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 11:12 AM

मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि काजोल ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या जोडीच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. काजोलने तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन अजय देवगणशी लग्न केलं असं म्हटलं जातं. 1999 मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले आणि नुकतंच त्यांच्या लग्नाला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर काही वर्षे काजोल चित्रपटांपासून दूर राहिली आणि वैवाहिक आयुष्याकडे लक्ष दिलं. आता पुन्हा एकदा ती चित्रपट आणि ओटीटीवर सक्रिय झाली आहे. मोठ्या पडद्यावर काजोलसोबत अभिनेता शाहरुख खानच्या जोडीला सर्वाधिक पसंती मिळाली. मात्र किंग खानसोबतची तिची जोडी अजयला एकेकाळी आवडायची नाही असं म्हटलं जातं.

अजयने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यास दिला होता नकार

काजोल आणि शाहरुख यांच्यातील केमिस्ट्री पाहून अजयला एकेकाळी फार ईर्षा व्हायची, असं म्हटलं जातं. याचमुळे त्याने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला होता. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटानंतर काजोल आणि शाहरुखच्या मैत्रीची अधिकाधिक चर्चा होऊ लागली होती. हीच गोष्ट अजयला पसंत पडली नाही. म्हणूनच त्याने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला.

शाहरुख खानची प्रतिक्रिया

एका मुलाखतीत शाहरुखला याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “अजयने तिच्यासमोर अशी कोणती अट ठेवल्याचं मला माहीत नाही. पण जर त्याने नकार दिला म्हणून काजोल माझ्यासोबत काम करत नसेल तर मी अजयच्या निर्णयाचा आदर करतो. पण मला वाटत नाही की असं काही झालं असेल. कारण हे जरा विचित्र आहे. जर गौरी अभिनेत्री असती तर मी तिला कधीच म्हटलं नसतं की तू कोणासोबत काम करावंस आणि कोणासोबत नाही.”

हे सुद्धा वाचा

काजोल आणि अजयने लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. ‘इश्क’, ‘प्यार तो होना ही था’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. बऱ्याच वर्षांनंतर ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. तर दुसरीकडे काजोल आणि शाहरुखने ‘बाजीगर’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दिलवाले दुल्हिनयाँ ले जाएंगे’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

काजोलची ‘द ट्रायल’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती वकिलाच्या भूमिकेत आहे. ‘द गुड वाइफ’ या अमेरिकी वेब सीरिजचा हा हिंदी रिमेक आहे. अजय देवगण, दीपक धर, मृणालिनी जैन आणि राजेश चड्ढा यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.