Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जे माझं आहे ते तुला कधीच मिळणार नाही”; अभिषेक बच्चनला बिग बी असं का म्हणाले?

अमिताभ बच्चन लवकरच कौन बनेगा करोडपती या शोचा पंधरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. 2000 मध्ये या शोची सुरुवात झाली होती. ABCL ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर बिग बींनी 'केबीसी' हा शो सुरू केला. याच शोने त्यांचं करिअर सावरलं आणि अभिनेते म्हणून त्यांनी नवी सुरुवात केली होती.

जे माझं आहे ते तुला कधीच मिळणार नाही; अभिषेक बच्चनला बिग बी असं का म्हणाले?
Abhishek and Amitabh BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 11:23 AM

मुंबई | 17 जुलै 2023 : बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे चित्रपटांमधील विविध भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतात. मात्र त्याचसोबत छोट्या पडद्यावरील त्यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिॲलिटी शोसुद्धा तितकाच गाजतो. या शोमध्ये ते विविध पाहुण्यांनाही आमंत्रित करतात. बच्चन कुटुंबातील सदस्यसुद्धा अनेकदा या शोमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र शोच्या एका एपिसोडमध्ये जेव्हा अभिषेक बच्चन पाहुणा म्हणून आला, तेव्हा बिग बी स्पर्धक म्हणून हॉटसीटवर बसले होते. 2017 मधील हा एपिसोड आहे. अभिषेकने या शोमध्ये अनेकदा हजेरी लावली होती. ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटातील सहकलाकार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत यांच्यासोबतही तो एका एपिसोडमध्ये उपस्थित होता.

सप्टेंबर 2017 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’चा हा खास एपिसोड पार पडला होता. या जुन्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे हॉटसीटवर स्पर्धक म्हणून बसले आहेत तर अभिषेक बच्चन शोचं सूत्रसंचालन करताना दिसतोय. स्पर्धकाची ओळख करून देताना अभिषेक म्हणतो, “माझ्यासमोर मुंबईहून आलेले स्पर्धक श्री. अमिताभ बच्चन बसलेले आहेत. हे एक अभिनेते आहेत आणि हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलं आहे. यांना गाणं गाण्याची आणि सतत काम करण्याची फार आवड आहे. जर हे या शोमधून मोठी रक्कम जिंकत असतील तर ती रक्कम ते त्यांच्या मुलाला देऊ इच्छितात.”

अभिषेकचं हे वक्तव्य ऐकताच अमिताभ बच्चन म्हणतात, “हे तुम्हाला कोणी सांगितलं?” त्यावर अभिषेक म्हणतो, “तुम्हीच तर मला शिकवलंत की जे माझं आहे ते तुझंही आहे.” मुलाचं उत्तर ऐकून बिग बगी लगेच म्हणतात, “पण आज जे माझं आहे ते माझं आहे. हे तुझं होणार नाही कारण ते माझंच आहे.” या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन लवकरच कौन बनेगा करोडपती या शोचा पंधरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. 2000 मध्ये या शोची सुरुवात झाली होती. ABCL ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर बिग बींनी ‘केबीसी’ हा शो सुरू केला. याच शोने त्यांचं करिअर सावरलं आणि अभिनेते म्हणून त्यांनी नवी सुरुवात केली होती. आता पंधराव्या सिझनचं सूत्रसंचालनसुद्धा बिग बीच करणार आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.