अबू सालेमसोबतचे प्रेमसंबंध वादात, बनावट पासपोर्ट प्रकरणात मोनिका बेदीला झाली होती अटक!

बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी (Monica Bedi) तिच्या व्यावसायिक जीवनापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेचा भाग बनली होती. ‘प्यार इश्क और मोहब्बत’, ‘जोडी नंबर 1’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात मोनिकाने काम केले होते.

अबू सालेमसोबतचे प्रेमसंबंध वादात, बनावट पासपोर्ट प्रकरणात मोनिका बेदीला झाली होती अटक!
मोनिका बेदी
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 12:42 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी (Monica Bedi) तिच्या व्यावसायिक जीवनापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेचा भाग बनली होती. ‘प्यार इश्क और मोहब्बत’, ‘जोडी नंबर 1’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात मोनिकाने काम केले होते. इतकेच नाही तर, ती काही टीव्ही शोमध्येसुद्धा दिसली होती. परंतु, नंतर ही अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम (Abu Salem)  याच्या प्रेमात पडली. ज्यामुळे तिला तुरुंगाची हवादेखील खावी लागली. इतकंच नव्हे तर, बनावट पासपोर्ट प्रकरणात देखील तिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी मोनिकाला तुरुंगात जावे लागले होते. हे प्रकरण बर्‍याच वर्षांपर्यंत सुरु होते (When Don Abu Salem And Actress Monica Bedi Arrested for fake passport).

मात्र, आपल्याच काही चुकांमुळे अभिनेत्री मोनिका बेदी हिने स्वतःचे संपूर्ण करिअर उध्वस्त केले. यानंतर ती मनोरंजन विश्वातून देखील नाहीशी झाली.

अशी झाली अबू सालेमशी मैत्री

मोनिका आणि अबू सलेम यांची भेट दुबई येथे झाली. जिथे ते दोघे एकमेकांना भेटल्यानंतर फोनवर बोलू लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दुबईमध्येच एकत्र राहू लागले. मोनिका बेदीने एका मुलाखतीत सांगितले होते की, अबूने तिला आपले खरे नाव अर्सलन अली सांगितले होते. तो नेहमीच हे नाव वापरत असे. तो जगासाठी कसा होता हे महत्वाचे नाही, परंतु माझ्यासाठी तो नेहमी सामान्य माणसासारखाच जगला. 18 सप्टेंबर 2002 रोजी पोर्तुगालमधून बनावट पासपोर्ट प्रकरणात जेव्हा तिला आणि अबू सलेमला अटक केली गेली, तेव्हा मोनिकाच्या अडचणी वाढल्या. यावेळी अबू सालेमची पत्नी फौजिया उस्मान असल्याचा दावा करून तिने स्वत:च्या नावावर बनावट पासपोर्ट बनवल्याचा आरोप मोनिकावर लावण्यात आला होता (When Don Abu Salem And Actress Monica Bedi Arrested for fake passport).

पोर्तुगालमध्ये झाली अटक

बनावट कागदपत्रांचा वापर करून पोर्तुगालमध्ये प्रवेश केल्याबद्दल मोनिकाला आणि डॉन अबू सालेम यांना अटक करण्यात आली. 2005 पर्यंत मोनिका आणि अबू यांना पोर्तुगालमध्ये कैद करण्यात आले होते. चार वर्षांच्या कायदेशीर कारवाईनंतर दोघांनाही पोर्तुगालमधून सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना भारतात आणून भोपाळमधील तुरूंगात ठेवले गेले. 2006 मध्ये भोपाळच्या कोर्टाने मोनिकाला निर्दोष मुक्त केले. यानंतर राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयाला पुन्हा आव्हान दिले. सरकारचे अपील सत्र न्यायालयाने फेटाळले, त्यानंतर राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयात 12 वर्षे चालली सुनावणी

मोनिका बेदी यांच्या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात तब्बल 12 वर्ष चालली. राज्य सरकारने मोनिका बेदीवर हायकोर्टाने कारवाई करावी, अशी मागणी केली होती. दुसरीकडे, मोनिका आपण निर्दोष असल्याचे सांगत होती. भोपाळ जिल्हा कोर्टाने मोनिकाविरूद्ध कोणतेही पुरावे न मिळाल्यामुळे तिला निर्दोष सोडण्याचा निर्णय घेतला. 12 वर्षे कार्यवाही केल्यानंतर उच्च न्यायालयाने मोनिका बेदीच्या बाजूने निकाल दिला आणि जिल्हा कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

(When Don Abu Salem And Actress Monica Bedi Arrested for fake passport)

हेही वाचा :

Break Up story | 20 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नानांच्या प्रेमात पडली होती मनीषा कोईराला, ‘या’ कारणामुळे झाला होता ब्रेकअप

Video | बिकिनी अवतारात मंदिरा बेदीचा योगा, चाहत्यांना दिल्या ऑक्सिजन वाढवण्याच्या टिप्स!

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.