नाना पाटेकर जेव्हा आपल्या जुन्या मैत्रीणींसाठी आचारी बनतात; नानाच्या फार्महाऊसवर गप्पा, झोके आणि धम्माल

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, नीना कुळकर्णी आणि भारती आचरकेर यांनी नाना यांच्या फार्महाऊसवर एकत्र वेळ घालवत , जुन्या आठवणींना उजाळा देत धमाल केली.

नाना पाटेकर जेव्हा आपल्या जुन्या मैत्रीणींसाठी आचारी बनतात; नानाच्या फार्महाऊसवर गप्पा, झोके आणि धम्माल
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 8:49 AM

मराठी सिनेसृष्टी असो किंवा हिंदी… तेथील चकचकाट, ग्लॅमर याच्या चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. पण या झगमगत्या विश्वात जे तारे (सेलिब्रिटी) आपल्या दिसतात, ती असतात माणसंच… अगदी आपल्यासारखीच.. ! चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते म्हणून नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे नाव घेतले जाते. तर नीना कुळकर्णी (Neena Kulkarni)  यांच्या अभिनयाचे आपण सर्वच फॅन आहोत. हे दोघेही एकमेकांचे जुने मित्र (old friends) आहेत. हमीदाबाईची कोठी या नाटकापासून मैत्री असलेले हे दोघं बऱ्याच काळानंतर एकत्र भेटले.

नीना यांनी नुकतीच नाना यांच्या फार्महाऊसला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची जवळची मैत्रिण आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर याही सोबत होत्या. नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या तिघांनी त्या फार्महाऊसवर काय धमाल केली आहे हे आपल्याला त्यात पहायला मिळत आहे. तेथील आमराईतील सुवास, झोक्याचा लुटलेला आनंद, नानांच्या हातचं रांधलेले सुग्रास जेवण आणि जुन्या आठवणी-किश्शांना उजाळा देत मारलेल्या धमाल गप्पा आपल्याला यात पहायला मिळतात.

या व्हिडीओसोबत नीना यांनी त्यांच्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहे. नाना यांच्यासोबत मैत्री कशी झाली, काम करताना सहकलाकार होतो, पण मित्र झालो… आपापल्या आयुष्यात पुढे जाताना पाऊलवाटा शोधल्या, पण नाती तुटली नाहीत… इतक्या वर्षांनंतरही मित्रांचे भावबंध कसे आहेत हेच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केले आहे. नानाच्या वाडीतील सुबत्ता, त्यांचा पाहुणाचार या सर्वाने मन तृप्त झालं , असं त्यांनी लिहीलं आहे. इतक्या वर्षांची ही गााढ मैत्री अशी मजबूत आहे, ती तुटणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

नीना कुळकर्णी यांनी शेअर केलेली पोस्ट त्यांच्याच शब्दात…

ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं…. १९७८ साली रंगमंचावर हमीदाबाईची कोठी हया नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो.. विजया मेहतांच्या तालमीत तयार होता होता , हमिदाबाई ची कोठी, महासागर अश्या अविस्मरणीय नाटकांचे प्रयोग करता करता, सहकलाकारांचे मित्र झालो. सुखदुःखात साथ देत,भांडत ,हसत मस्तीत जगलो. होता होता आपआपल्या पाऊलवाटा शोधल्या. पण नाती सुटली नाहीत.. संबंध तुटले नाहीत.

आज ४५ हून अधिक वर्ष लोटली आहेत. तरीही स्नेह तसाच आहे, मैत्री वाढली आहे. मागील पानावरून पुढे! गप्पा, विनोद, चर्चा, प्रयोगातल्या आठवणींनी, दिवस रात्र अपुरे पडले! स्वतःच्या हातांने करुन वाढलेलं सुग्रास जेवण, नाना आणि त्याच्या परिवाराचं अगत्य, नाना च्या वाडीतली सुबत्ता… मन तृप्त झालं.

नीना कुळकर्णी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर हजारो लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. या तिघांची ही मैत्री सर्वांनाच खूप आवडली आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या या गेट-टुगेदरचं कौतुक केलंय.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.