सारा अली खानसोबत सुशांतने असं काय केलं होतं, ज्यामुळे अभिनेत्री म्हणाली, ‘तो निष्ठावंत नव्हता, मला सतत…’
Sara Ali Khan - Sushant Singh Rajput: 'तो निष्ठावंत नव्हता, मला सतत...', पोलीस चौकशीत सारा अली खानची हैराण करणारी कबुली, सुशांतने सारासोबत असं केलं तरी काय होतं? अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

Sara Ali Khan – Sushant Singh Rajput: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याच्या मृत्यू कारण नमूद करण्यात आलंय. शिवाया सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला देखील दिलासा मिळाला. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही असं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सांगायचं झालं तर सुशांत मृत्यू अनेकांचा जबाब नोंदवण्यात आला. अभिनेत्री सारा अली खान हिची देखील चौकशी करण्यात आली.
चौकशी दरम्यान अभिनेत्रीने सुशांत याच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. रिपोर्टनुसार, सारा हिने सुशांत डेट करत असल्याचं सांगितलं होतं. त्याचवेळी अभिनेत्रीने त्यांच्या ब्रेकअपचं कारण देखील सांगितलं. चौकशीत सारा म्हणाली, ‘सुशांत प्रचंड पझेसिव होता. माझ्या आगामी सिनेमांमध्ये फक्त सुशांतला कास्ट करा… असं दिग्दर्शकांना जाऊन सांग. असं तो सतत म्हणायचा…’ याचदरम्यान, सारा हिने ड्रग्स सेवनाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मी सिगारेट ओढली होती…’ अशी कबुली साराने चौकशीमध्ये दिली होती.
सुशांतबद्दल केयरटेकर दिलेली धक्कादायक माहिती
अभिनेत्याच्या निधनानंतर फार्महाऊसच्या केअरटेकरने IANS ला महत्त्वाची माहिती दिली होती. ‘2018 पासून सारा कायम फार्महाऊसवर यायची. पण 2019 नंतर सारा कधीच आली नाही. सुशांत तर सारा हिच्यासोबत एका ट्रिपची प्लानिंग करत होता. पण ती ट्रिपनंतर रद्द देखील झाली. सुशांत जेव्हा सारा हिच्यासोबत फार्महाऊसवर यायचा तेव्हा दोघे 3 – 4 दिवस एकत्र राहायचे. थायलँडहून परतल्यानंतर देखील दोघे थेट फार्महाऊसवर आले होते.’ असं देखील माहिती सुशांतच्या केयरटेकरने दिली होती.




सांगायचं झालं तर, सारा अली खान हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत बॉलिवूड करियरला सुरुवात केली. ‘केदारनाथ’ सिनेमातून सारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देखील अनेकदा सुशांत आणि सारा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण दोघांनी देखील कधीच तेव्हा नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही.