‘तो पलकला अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि…’, लेकीसोबत वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर भडकली श्वेता तिवारी
लेकीसोबत वाईट कृत्य करणाऱ्या 'त्या' व्यक्तीवर संतापली श्वेता तिवारी, घेतला मोठा निर्णय, अभिनेत्री म्हणाली, 'तो पलकला अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि...', श्वेता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रोफेशनल आयुष्यात श्वेता यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. खासगी आयुष्यात श्वेता हिच्यासोबत लेक पलक हिला देखील मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. श्वेता तिवारी हिने दुसरं लग्न केल्यानंतर अभिनेत्रीच्या अडचणी वाढल्या.
पहिल्या घटस्फोटानंतर श्वेताने 2013 मध्ये अभिनव कोहली याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनव लेक पलक हिच्यासोबत वाईट कृत्य करत असल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला. सावत्र वडील पलक हिला मारहाण करण्याचा एवढंच नाही, सावत्र वडील अभिनव, पलक हिला मॉडेलचे अश्लील फोटो दाखवायचा. त्याचप्रमाणे तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील करायचा, असा दावा श्वेताने केला होता.




View this post on Instagram
सावत्र वडिलांकडून मुलीला होत असलेला त्रास पाहून श्वेता तिवारी हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. आज पलक तिची आई श्वेता तिवारी हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
श्वेता तिवारीचं पहिलं लग्न
पलक हिची आई श्वेता तिवारी आणि वडील राजा चौधरी यांची भेट एका भोजपुरी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. भेटीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर दोघांमधील वाद वाढू लागले. श्वेता हिने राजा याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
पलक हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, पलक हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता पलक ‘भुतनी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.