‘सूर्यवंशम’मध्ये अमिताभ बच्चन यांचं प्रेम नाकारणारी ‘ती’ सध्या काय करते? फिल्म इंडस्ट्रीत मिळालं अपयश
आता रचनाला ओळखणं खूपच कठीण आहे. ती आता चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. रचनाने तिचा साडीचा आणि कॉमेस्टिक्सचा ब्रँच लाँच केला आहे. ती आता पूर्णपणे बिझनेसवुमन झाली आहे.
मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही ते इंडस्ट्रीत अद्याप सक्रिय आहेत. बिग बींच्या करिअरमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘सूर्यवंशम’. टीव्हीवर हा चित्रपट अद्याप पाहिला नसेल अशी क्वचितच एखादी व्यक्त असेल. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. या कलाकारांच्या तोंडी असलेले डायलॉग्ससुद्धा प्रेक्षकांना पाठ आहेत. यामध्ये गौरीची भूमिका अभिनेत्री रचना बॅनर्जीने साकारली होती. या गौरीवर हिराचं (अमिताभ बच्चन) लहानपणापासून प्रेम असतं. मात्र आता ती अभिनेत्री काय करतेय याबद्दल जाणून घेऊयात.
‘सूर्यवंशम’ हा बिग बींच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. 1990 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि व्ही. व्ही. सत्यनारायण यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये अभिनेत्री सौंदर्यासोबतच्या बिग बींच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली होती. मात्र हिराच्या आयुष्यात राधाच्या येण्याआधी गौरी होती, जिच्यावर तो लहानपणापासून जिवापाड प्रेम करायचा. मात्र हिरा अशिक्षित असल्याने गौरी त्याचं प्रेम नाकारते. गौरीची भूमिका साकारणारी रचना सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे.
View this post on Instagram
आता रचनाला ओळखणं खूपच कठीण आहे. ती आता चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. रचनाने तिचा साडीचा आणि कॉमेस्टिक्सचा ब्रँच लाँच केला आहे. ती आता पूर्णपणे बिझनेसवुमन झाली आहे. रचनाने तिच्या करिअरमध्ये 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदीसोबतच तिने दाक्षिणात्य आणि बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बंगाली, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची दाद मिळवली. मात्र चित्रपटसृष्टीतील हे करिअर फारसं चालू शकलं नाही. त्यामुळे इंडस्ट्रीपासून दूर ती सध्या तिचा स्वत:चा व्यवसाय करत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून सूर्यवंशम हा चित्रपट या वाहिनीवर वारंवार दाखवला जातो. त्यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्ससुद्धा व्हायरल झाले आहेत. सोनी मॅक्सवर हा चित्रपट इतक्या वेळा का दाखवला जातो, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचं उत्तर म्हणजे या वाहिनीने सूर्यवंशम या चित्रपटाचे तब्बल 100 वर्षांचे राइट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे हा करार पूर्ण होईपर्यंत सोनी मॅक्सवर सतत ‘सूर्यवंशम’ प्रसारित केला जाणार आहे.