Saif Ali Khan च्या ५ हजार कोटींच्या संपत्तीवर हक्क कोणाचा? मुलांना नाही मिळणार एकही रुपया

Saif Ali Khan | सारा, इब्राहिम, तैमूर, जेह यांच्यामध्ये वाटणी नाही होऊ शकत सैफ अली खान याची गडगंज संपत्ती? कारण जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्या संपत्तीची चर्चा...

Saif Ali Khan च्या ५ हजार कोटींच्या संपत्तीवर हक्क कोणाचा? मुलांना नाही मिळणार एकही रुपया
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 8:22 AM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : अभिनेता सैफ अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील एक महत्त्वाच्या कारणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. गडगंज संपत्ती असणारा सैफ अली खान आणि त्याचं कुटुंब रॉयल आयुष्य जगतं. खान कुटुंबातील अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण आता अभिनेत्याच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे. पतौडी कुटुंबातील सैफ अली खान हा १० वा नवाब आहे. रिपोर्टनुसार, हरियाणा येथील पतौडी पॅलेस आणि भोपाळ येथील संपत्ती मिळून अभिनेत्याकडे तब्बल ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. सैफ अली खान याच्या संपत्तीची वाटणी त्याच्या मुलांमध्ये होईल अशी चर्चा आहे. पण सैफ संपत्तीची वाटणी त्याच्या चार मुलांमध्ये करू शकत नाही.

सैफ अली खान मुलांमध्ये संपत्तीची वाटणी करु शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये काही कौटुंबिक वाद आहेत.. अशा देखील चर्चा रंगल्या, पण असं काहीही नाही. रिपोर्टनुसार, सैफ अली खान याची जेवढी संपत्ती आहे, ती भारत सरकारच्या ऐनिमि डिस्प्यूट एक्ट अंतर्गत येते.

अभिनेत्याकडे तब्बल ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती

ऐनिमि डिस्प्यूट एक्ट अंतर्गत येणाऱ्या संपत्तीवर कोणीही उत्तराधिकारी होण्याचा हक्क गाजवू शकत नाही. हा कायदा 1968 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मंजूर करण्यात आला होता, ज्यामध्ये 2016 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यामुळे अभिनेत्याला सारा, इब्राहिम, तैमूर, जेह यांच्यामध्ये संपत्तीची वाटणी करता येणार नाही.

आता सैफ अली खान यांच्या संपत्तीवर Custodian of the Enemy property for India अंतर्गत भारत सरकारचा अधिकार आहे. एवढंच नाही तर संपत्तीचा मालकी हक्क देखील सैफ अली खान याच्या नावे हस्तांतरीत होवू शकत नाही. पण जर कोणाला हक्क हवा असेल तर, तो कायद्याची मदत घेवू शकतो.. असं देखील सांगण्यात येत आहे.

सांगायचं झालं तर सैफ अली खान याचे पंजोबा, हमीदुल्लाह खान ब्रिटिश शासन काळात नवाब होते आणि त्यांनी त्यांची संपत्ती  कोणाच्याही नावे केली नव्हती. सध्या संपत्तीमुळे सैफ अली खान चर्चेत आला आहे. खान कुटुंबाचं रॉयल आयुष्य कायम सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असतं.

सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर बॉलिवूडच्या अव्वल सेलिब्रिटींपैकी एक आहेत. सैफ अली खान याची पहिली पत्नी अमृता सिंग देखील बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री होती. आता अमृता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तर अमृता आणि सैफ यांची मुलगी सारा अली खान आता बॉलिवूडवर राज्य करत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.