Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aarti Mittal | 15 हजार रुपयांसाठी सेक्स रॅकेट चालवणारी अभिनेत्री आरती मित्तल आहे तरी कोण?

पोलीस इन्स्पेक्टर मनोज सुतार यांना माहिती मिळाली होती की आरती नावाची एक अभिनेत्री गोरेगावमध्ये सेक्स रॅकेट चालवते. त्यानंतर पोलिसांकडून डमी कस्टमरला हॉटल पाठवलं गेलं आणि त्यांनी आरतीशी संपर्क साधला.

Aarti Mittal | 15 हजार रुपयांसाठी सेक्स रॅकेट चालवणारी अभिनेत्री आरती मित्तल आहे तरी कोण?
Aarti MittalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 6:22 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचं आणि अभिनयविश्वात पाऊल ठेवण्याचं स्वप्न अनेकांसाठी नव्या अडचणी निर्माण करतं. अनेकदा अभिनय क्षेत्रात काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रींना दुसऱ्याच व्यवसायात ढकललं जातं. झगमगत्या मायानगरीत या अभिनेत्रींना स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी, फॅशन आणि स्टाइलसाठी पैशांची गरज भासते. अशा वेळी काही जणी वेश्या व्यवसायात अडकतात. मुंबई पोलिसांनी नुकताच अशा एका रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनेत्री आरती मित्तल मुंबईत सेक्स रॅकेट चालवत होती. मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 11 ने या रॅकेटचा खुलासा केला. पोलिसांनी गोरेगावमधील एका हॉटेलमधून दोन मॉडेल्सची सुटका केली. या कामाच्या बदल्यात 15 हजार रुपये देण्याचं आश्वासन आरतीने दिल्याचं या मॉडेल्सनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पोलीस इन्स्पेक्टर मनोज सुतार यांना माहिती मिळाली होती की आरती नावाची एक अभिनेत्री गोरेगावमध्ये सेक्स रॅकेट चालवते. त्यानंतर पोलिसांकडून डमी कस्टमरला हॉटल पाठवलं गेलं आणि त्यांनी आरतीशी संपर्क साधला. आरतीन दोन मुलींना पाठवण्यासाठी 60 हजार रुपयांची मागणी केली होती. अशा पद्धतीने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी आरती मित्तलला अटक केली.

कोण आहे आरती मित्तल?

आरती मित्तल ही टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने ‘अपनापन- बदलते रिश्तों का बंधन’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. अभिनेत्रीसोबतच ती कास्टिंग डायरेक्टरसुद्धा आहे. मुंबईतील ओशिवरा परिसरातील आराधना अपार्टमेंटमध्ये ती राहते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून इन्स्टाग्रामवर तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.