Baba Siddique : लग्झरी कारचे शौकीन, बॉलिवूडशी खास संबंध, पार्टी देण्यासाठी प्रसिद्ध; बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती माहीत आहे का ?

Baba Siddique Net Worth : बॉलिवूडमध्ये दर वर्षी रमजान दरम्यान बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी चर्चेत असते. त्या पार्टीसाठी शाहरूख, सलमान यासह बॉलिवूडचे अनेक नामवंत सेलिब्रिटी हजेरी लावतात. एकाहून एक शानदार पार्टी देणाऱ्या बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती माहीत आहे का ?

Baba Siddique : लग्झरी कारचे शौकीन, बॉलिवूडशी खास संबंध, पार्टी देण्यासाठी प्रसिद्ध; बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती माहीत आहे का ?
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 1:10 PM

मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडत असल्याचं ट्विट केलं आणि एकच खळब माजली. काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा पक्ष सोडून गेल्यानंतर आता आणखी एका मोठ्या नेत्याच्या एक्झिटमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. दरवर्षी त्यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. या पार्टीसाठी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सही शामिल होतात. शाहरूख खान, सलमान खान हेही आवर्जून सिद्दीकी यांच्या पार्टीत शामिल होतात. सलमान खान याचे बाबा सिद्दीकीशी जवळचे संबंध आहे.

दरवर्षी त्यांच्या इफ्तार पार्टीची सोशल मीडियावर मोठी चर्चा असते, फोटो, व्हिडीओ गाजत असतात. ज्यांच्या पार्टीसाठी स्टार्स आवर्जून येतात, असे हे बाबा सिद्दीकी नेमके आहे तरी कोण, त्यांचे नेटवर्थ किती आहे, हे सगळं जाणून घेऊया.

कोण आहेत बाबा सिद्दीकी ?

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या एका जुन्या नेत्यांपैकी एक असलेले बाबा सिद्दीकी बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते काँग्रेसशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी अनेक आंदोलनांतही सहभग घेतला होता. त्यांनी मुंबईतील एमएमके कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबांनी दोनदा नगरसेवक म्हणून काम पाहिले. यानंतर ते तीनवेळा काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेत आमदारही झाले.

बाबा सिद्दीकी नेटवर्थ

बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांचे नेटवर्थ 7.2 मिलियन इतके आहे. पण त्यांच्या खऱ्या कमाईबाबत अधिकृत माहिती अज्ञात आहे. बाबा सिद्दीकी यांचे मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सशी चांगले संबंध आहेत. रमजान दरम्यान ते दरवर्षी खूप मोठी पार्टी देतात.त्यामध्ये बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटीदेखील सहभागी होतात. मिळालेल्या माहितीनुसार, 2018 साली बाबा सिद्दीकी यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता, त्यामध्ये 462 कोटी संपत्ती असल्याचे समोर आले होते.

लग्झरी कारचाही शौक

बाबा सिद्दीकी यांना लग्झरी कार्सचीही आवड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ S क्लास, बीएडब्ल्यू 7 सीरिज आणि रोल्स रॉयस फँटम कार असल्याचे समजते. तसेच त्यांच्या ताफ्यात आणखीही अनेक आलिशान गाड्या आहेत.

सलमानसोबत खास नातं

बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे खूप जवळचे नाते आहे. ते दोघंही अनेकदा एकत्र दिसतात. अनेक समाजसेवेच्या कामातही सलमान बाबांसोबत दिसतो. सलमान खान हा केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर अनेक वादांमुळेही चर्चेत असतो. हिट अँड रन केस असो किंवा काळवीटाची शिकार, सलमानच्या अनेक कृत्यांनी खळबळ माजवली. याप्रकरणात सलमानला तुरूंगातही जावं लागलं होतं. जेव्हा जेव्हा सलमान अडचणीत सापडला, तेव्हा बाबा सिद्दीकी नेहमीच त्याच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याचे दिसले. त्याच्या प्रत्येक केसच्या सुनावणीदरम्यान बाबा सिद्दीकी कोर्टात हजर होते, किंवा ते सलमानच्या कुटुंबियांची मदत करताना दिसले.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.