Love Life : कोण आहे आर्यन खान याची गर्लफ्रेंड? श्रीदेवी यांच्यासोबत खास कनेक्शन

Love Life : शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त तरुणी म्हणाली...; तिचं श्रीदेवी यांच्यासोबत खास कनेक्शन, कोण आहे 'ती'? सध्या सर्वत्र किंग खान याच्या लेकाच्या खासगी आयुष्याची चर्चा... कोण आहे ती, जिने सर्वांसमोर केलं प्रेम व्यक्त...

Love Life : कोण आहे आर्यन खान याची गर्लफ्रेंड? श्रीदेवी यांच्यासोबत खास कनेक्शन
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 10:02 AM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा असल्यामुळे आर्यन खान कायम चर्चेत असतो. आर्यन खान याने अद्याप अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं नाही, तरी देखील आर्यन खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील आर्यन खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, आर्यन याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. किंग खान याचा मुलगा असल्यामुळे आर्यन खान याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आर्यन खान कोणाला डेट करत आहे, त्याच्या आयुष्यात खास स्थान कोणाला आहे? इत्यादी गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियवर आर्यन खान याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता देखील आर्यनचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आर्यन खान याचा फोटो शाहरुख खान किंवा गौरी यांनी पोस्ट केला नसून एका तरुणीने पोस्ट केला होता. शिवाय आर्यन खान याच्यावर असलेलं प्रेम देखील तरुणीने व्यक्त केलं होतं.

आर्यन खान याचा फोटो स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट करणारी तरूणी दुसरी तिसरी कोणी नसून पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीने आर्यन याचा फोटो पोस्ट केला होता. आर्यन याचा फोटोवर अभिनेत्रीने बदाम असलेला इमोजी पोस्ट केला होता. त्यामुळे आर्यन आणि सजल याच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

हे सुद्धा वाचा

‘आर्यन खान याची गर्लफ्रेंड आहे का?’ यांसारखे अनेक प्रश्न तेव्हा उपस्थित करण्यात आले. पण सजल हिने कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेलं नव्हतं. म्हणून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. पण यावर आर्यन खान याने कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नव्हतं..

सजल अली हिचं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत खास कनेक्शन

सजल अली हिचं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत खास कनेक्शन आहे. ‘मॉम’ सिनेमात सजल हिने श्रीदेवी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात सजल हिने श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी देखील सिनेमाला पसंती दर्शवली होती.

सजल पाकिस्तान येथील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील सजल कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. २०१९ मध्ये सजल हिने बॉयफ्रेंड अहद रजा मीर याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर देखील सजल तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.