Vidyut Jammwal | विद्युत जामवालच्या होणाऱ्या पत्नीचं करिश्मा कपूरच्या पूर्व पतीशी खास कनेक्शन; कोण आहे नंदिता?
अभिनेता विद्युत जामवाल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. लंडनमध्ये तो गर्लफ्रेंड नंदिता महतानीशी लग्न करणार आहे. विद्युतची होणारी पत्नी कोण, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. नंदिताचं करिश्मा कपूरच्या पूर्व पतीशी खास कनेक्शन आहे.
मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या फिटनेस, स्टंट्स आणि ॲक्शन सीक्वेन्समुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. विद्युत त्याची गर्लफ्रेंड नंदिना महतानीशी लंडनमध्ये लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांनी 2021 मध्ये साखरपुडा केला होता. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या ब्रेकअपच्याही चर्चा होत्या. मात्र आता विद्युत आणि नंदिता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. विद्युतची होणारी पत्नी नंदिता कोण आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात..
नंदिता महतानी ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ती अभिनेता डिनो मोरियासोबत मिळून प्ले-ग्राऊंड नावाची एक कंपनी चालवते. इतकंच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून ती क्रिकेटर विराट कोहलीची डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे. नंदिताचं अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरशीही खास कनेक्शन आहे. नंदिता ही संजयची पहिली पत्नी आहे. लग्नाच्या काही वर्षांतच दोघं विभक्त झाले. नंदिताला घटस्फोट दिल्यानंतर संजयने करिश्मा कपूरशी लग्न केलं. मात्र करिश्मा आणि संजय यांचंही लग्न फार काळ टिकलं नाही. 2016 मध्ये दोघं विभक्त झाले.
View this post on Instagram
संजयला घटस्फोट दिल्यानंतर नंदिताचं इतरही काही बॉलिवूड अभिनेत्यांसोबतच नाव जोडलं गेलं होतं. यामध्ये रणबीर कपूर, डिनो मोरिया यांचा समावेश आहे. मात्र त्यावर नंदिताने कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. 2021 पासून विद्युत आणि नंदिता यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर दोघांनी साखरपुड्याच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर फोटो शेअर करत नात्याची घोषणा केली.
अभिनेता विद्युत जामवालने तेलुगू चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये ‘कमांडो’ चित्रपटाच्या माध्यमातून विद्युतने नाव कमावलं. या चित्रपटातील विद्युतच्या अभिनय आणि मार्शल आर्ट्सचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं.