अभिषेकने घटस्फोटाबद्दलची पोस्ट ‘लाईक’ का केली? खरं कारण आलं समोर
नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या एण्ट्रीनेही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच अभिषेकने इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट लाईक केली. ही पोस्ट घटस्फोटाशी संबंधित होती.
ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चा असतानाच अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर घटस्फोटाशी संबंधित एक पोस्ट लाईक केली. या लाईकवरून आणखी चर्चांना उधाण आलं. एकीकडे अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीय वेगवेगळे आल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अभिषेकने घटस्फोटाबद्दलच्या पोस्टला लाईक करून चर्चांना आणखी हवा दिली. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. अशातच अभिषेकच्या ‘लाईक’मागील खरं कारण समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर लेख लिहिणाऱ्या हिना खंडेलवाल यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
एका पत्रकाराने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधिची पोस्ट शेअर केली होती. त्यात ‘इंडियन इक्स्प्रेस’च्या ‘आय मॅगझिन’मधील लेख होता, जो हिना यांनी लिहिला होता. ‘जेव्हा प्रेम सोपं होणं थांबतं,’ असं त्या पोस्टवर लिहिलेलं होतं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये घटस्फोटाविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. हीच पोस्ट अभिषेकने लाईक केली होती.
ऐश्वर्यामुळे लाईक केली पोस्ट?
‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका युजरने अभिषेकच्या ‘लाईक’मागे खरं कारण काय असू शकतं, याचा खुलासा केला आहे. ऐश्वर्या रायचा मित्र झिरत मार्करने या लेखात योगदान दिल्याने अभिषेकने ती पोस्ट लाईक केली असेल, असं त्याने म्हटलंय.
लेखिकेचं काय म्हणणं आहे?
घटस्फोटासंबंधित लेख लिहिणाऱ्या हिना यांनी या सर्व चर्चांदरम्यान इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. “मी त्याच्या खासगी आयुष्याशी परिचित नाही. परंतु पोस्टवर त्याने केलेल्या लाईकवरून प्रमाणाबाहेर चर्चा होत आहेत. या प्रकरणाला उगाच वाढवलं जातंय. त्याचा बचाव करण्यासाठी त्याला माझी नक्कीच गरज नसली तरी, माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मी त्याच्या ‘लाईक’चा उल्लेख करणं या संपूर्ण परिस्थितीला कारणीभूत ठरल्याचं पाहून मला वाईट वाटतंय”, असं त्यांनी म्हटलंय.
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘तुमच्या माहितीकरता सांगू इच्छिते की माझ्या त्या पोस्टला जितके लाईक्स मिळाले आहेत, तितकेच शेअर्स आणि सेव्ह मिळाले आहेत. ज्या लोकांनी माझी पोस्ट लाईक केली नाही किंवा त्यावर कमेंट केली नाही, त्यांनीसुद्धा माझ्या लेखाच्या विषयाचं कौतुक केलं आहे. या प्रतिसादातूनच सर्वताही स्पष्ट होतंय.’
View this post on Instagram
ऐश्वर्याचा मित्र झिरक यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते लहान मुलांचे आणि प्रौढांचे मानसोपचारतज्ज्ञ आहेत. मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 2016 मध्ये ऐश्वर्याच्याच हस्ते झिरक यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं होतं. तर अभिषेकने त्याच्या ‘घूमर’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रित केलं होतं.