मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; पावती लीक होताच धर्मावरून मोठा वाद, काय आहे संपूर्ण प्रकरण?
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांनी मित्र मम्मूटी यांच्यासाठी शबरीमला मंदिरात प्रार्थना केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मोहनलाल यांच्या पूजेची पावती सोशल मीडियावर लीक झाली आहे. हा वाद नेमका काय आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

आपल्या एका मित्रासाठी मंदिरात प्रार्थना केल्यामुळे वाद होऊ शकतो का, असा प्रश्न सहसा सर्वसामान्यांना पडणार नाही. पण हाच प्रश्न दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका सुपरस्टारला पडला आहे. या सुपरस्टारचा चाहतावर्ग केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही आहे. मोहनलाल असं त्यांचं नाव आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांनी नुकतंच त्यांचा खास मित्र आणि अभिनेता मम्मूटी यांच्यासाठी शबरीमला मंदिरात प्रार्थना केली. परंतु याच प्रार्थनेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मोहनलाल यांनी मम्मूटी यांच्यासाठी शबरीमला मंदिरात ‘उषा पूजा’ केली होती. यावरून काही लोक मोहनलाल यांच्यावर टीका करत आहेत, कारण मम्मूटी मुस्लीम आहेत. मम्मूटी यांचा धर्म...