Netflix: जगात टॉप, भारतात फ्लॉप? भारतात नेटफ्लिक्सची पिछेहाट का? वाचा 3 कारणं

नेटफ्लिक्सवरील कंटेटला जागितक स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असते. नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजच्या प्रतीक्षेत जगभरातील प्रेक्षक असतो. मात्र, भारतीय ग्राहकांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी कंटेट निर्मितीला नेटफ्लिक्सला संघर्ष करावा लागत आहे.

Netflix: जगात टॉप, भारतात फ्लॉप? भारतात नेटफ्लिक्सची पिछेहाट का? वाचा 3 कारणं
भारतात का गळती? Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 10:39 PM

नवी दिल्ली- सबस्क्रायबर्सची घटती संख्या नेटफ्लिक्स (NETFLIX) समोर चिंतेचा विषय बनली आहे. जागतिक आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला भारतात अद्यापही सूर गवसलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रतिस्पर्धांकडून मोठ्या प्रमाणात धोबीपछाड मिळत आहेत. भारतीय बाजारात नेटफ्लिक्सची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होत आहे. भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात नेटफ्लिक्स अपय़यशी ठरत असल्याचं देखील मत अभ्यासकांनी वर्तविलं आहे. नेटफ्लिक्सवरील कंटेटला जागितक स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असते. नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजच्या (NETFLIX WEBSERIES) प्रतीक्षेत जगभरातील प्रेक्षक असतो. मात्र, भारतीय ग्राहकांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी कंटेट निर्मितीला (CONTENT CREATION) नेटफ्लिक्सला संघर्ष करावा लागत आहे. भारतात नेटफ्लिक्स अपयशी ठरण्यामागं प्लॅनच्या वाढत्या किंमती, भारतीय केंद्रित कंटेटचा अभाव आणि थिंक टँकला सोडचिट्ठी ही तीन प्रमुख कारण सांगितली जातात.

1. आवाक्याबाहेरचे सबस्क्रिप्शन प्लॅन

अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने प्लॅनच्या किंमतींना कात्री लावण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2021 मध्ये नेटफ्लिक्सने 18-60% दराने प्लॅन दरात कपात केली. मात्र, भारतातील 60 सहस्पर्धक कंपन्यांचे वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन नेटफ्लिक्सच्या मासिक प्लॅनपेक्षाही स्वस्त असल्याचं समोर आलं होतं. नेटफ्लिक्सच्या पिछाडीमागे प्रमुख कारणांत भारतीय सबस्क्रायबर्सच्या आवाक्याबाहेरील प्लॅनच्या किंमती असल्याचं सांगितलं जातं. छोट्या शहरांत एकवटलेल्या वर्गाच्या आवाक्याबाहेर आहेत.

2. थिंक टँकला गळती

नेटफ्लिक्सच्या थिंक टँकला गळती लागली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सोडचिट्ठीचं सत्र कायम आहे. सृष्टी बेहल आर्या, आशिष सिंग, अभिषेक व्यास, दिव्या पाठक या थिंक टँक मधील मंडळींनी नवी वाट शोधली आहे. नेटफ्लिक्स कडून नव्या संकल्पनांचे स्वागत होत नसल्याचे महत्वाचं कारण राजीनाम्यामागं दडलं असल्याचं सांगितलं जातं.

3. ग्लोबल डंका, लोकल फ्लॉप

नेटफ्लिक्सच्या भारतातील आगमनाला साडेसहा वर्षे पूर्ण होत आहे. गेल्या तीन वर्षापासून स्थानिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचं धोरणाला नेटफ्लिक्सनं गती दिली आहे. भारतात अंदाजित 70% टीमची बांधणी कोविड काळात करण्यात आली. भारतात सदस्यांसोबत प्रतिबद्धता, महसूल आणि सबस्क्रायर्स संख्येत संभाव्य वाढ हे उद्दिष्ट असल्याचं नेटफ्लिक्सच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

भारतातील नेटफ्लिक्सचे सबस्क्रायबर (मिलियन, दशलक्षांत)

· डिस्ने+ हॉटस्टार – 50

· अमेझॉन प्राईम व्हिडिओ- 22

· सोनी लिव्ह – 6.8

· झी5- 6.5

· नेटफ्लिक्स- 5

ओटीटी व्हिडिओ रेव्ह्यन्यू मार्केट

· डिस्ने: 17%

· प्राईम व्हिडिओ: 20%

· नेटफ्लिक्स : 20%

· झी 5 : 9%

· सोनी लिव्ह : 4%

· अल्ट बालाजी : 4%

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.