रश्मिका मंदाना हिचा साखरपुडा मोडल्याचं खरं कारण, 14 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत अडकणार होती विवाहबंधनात
rashmika mandanna engagement : वयाच्या 22 व्या रश्मिका मंदाना हिने घेतला होता लग्न करण्याचा निर्णय, 14 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती अभिनेत्री... नात्याचा अंत होता अत्यंत वाईट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा
मुंबई | 9 जानेवारी 2024 : अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna) सध्या दाक्षिणात्य सुपपस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा होणार असल्याची देखील चर्चा आहे. पण काही वर्षांपूर्वी रश्मिका हिचा साखरपुडा 14 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत झाला होता. वयाच्या 22 व्या वर्षी रश्मिका हिने अभिनेता रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) याच्यासोबत साखरपुडा केला होता. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर रश्मिका आणि रक्षित यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, रश्मिका हिने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रिक पार्टी’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सिनेमात रश्मिका आणि रक्षित यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. रश्मिका हिचा पहिलाच सिनेमा सुपरहीट झाला. आज इंडस्ट्रीमध्ये रश्मिका हिचं नाव फार मोठं आहे. एवढंच नाही तर, रश्मिका हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
पहिल्या सिनेमानंतरच रश्मिका हिची लोकप्रियता वाढू लागली. दरम्यान, रश्मिका आणि रक्षित यांच्यामध्ये प्रेम बहरलं. सर्वत्र दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगू लागली. एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रश्मिका आणि रक्षित यांनी साखरपुडा केला. तेव्हा रश्मिका हिने 14 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत कुटुंबात रक्षित याचं स्वागत केलं होतं.
रक्षित आणि रश्मिका यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सतत वाद होत असल्यामुळे रक्षित आणि रश्मिका विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनी करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. रक्षित देखील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.
साखरपुडा तुटल्यानंतर रश्मिका हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये देखील रश्मिका हिने स्वतःचं भक्कम स्थान पक्क केलं आहे. आता रश्मिका आणि विजय यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. पण यावर रश्मिका – विजय आणि त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.