‘चला हवा येऊ द्या’मधला विनोदवीर घेणार ब्रेक? कोण आहे तो विनोदवीर, काय आहे ब्रेकमागचं कारण?

'चला हवा येऊ द्या' हा लोकप्रिय कार्यक्रम लागला की सगळे आपल्या हातातले काम सोडून टीव्ही समोर येऊन बसतात. 'चला हवा येऊ द्या'नं अवघ्या महारष्ट्राला भुरळ घातली आहे. त्यांची कार्यक्रमाची जादू काही अजबच आहे. अवघा महाराष्ट्र या कार्यक्रमाला डोक्यावर घेतो. मात्र, या लोकप्रिय कार्यक्रमातील एक विनोदवीर ब्रेक घेणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

'चला हवा येऊ द्या'मधला विनोदवीर घेणार ब्रेक? कोण आहे तो विनोदवीर, काय आहे ब्रेकमागचं कारण?
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 1:49 PM

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम लागला की सगळे आपल्या हातातले काम सोडून टीव्ही समोर येऊन बसतात. ‘चला हवा येऊ द्या’नं अवघ्या महारष्ट्राला भुरळ घातली आहे. त्यांची कार्यक्रमाची जादू काही अजबच आहे. अवघा महाराष्ट्र या कार्यक्रमाला डोक्यावर घेतो. मात्र, या लोकप्रिय कार्यक्रमातील एक विनोदवीर ब्रेक घेणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र, या कार्यक्रमात तो विनोदवीर कोण आहे. याबद्दल सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘चला हवा येऊ द्या’मधील सागर कारंडेनं (Sagar karande) सर्वांना खळखळून हसवलं आहे. महाराष्ट्रातील घराघरामध्ये सागर पोहचलाय. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात कधी पोस्टमन काका बनून सागरनं रडवलं देखील आहे. मात्र, आता सागर ब्रेक घेणार असल्याचं बोललं जातंय. या मागचं कारणही समोर आलं आहे. सागर, श्रेया बुगडे, (Shreya Bugade) भाऊ कदम, (Bhau kadam)) यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जी रंगत आणली आहे ती काही वेगळीच आहे. पण, याच टीममधील सागर कारंडेच्या ब्रेक घेण्यासंदर्भातली चर्चा सध्या रंगली आहे.

सागरचा प्रवास नाटकाच्या दिशेनं? सागरनं नुकतचं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सागरनं ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. या नाटकात सागर सध्या काम करत आहे. या फोटोवर महाराष्ट्रातील शहारांची नावे लिहीली आहे. तर 100 टक्के मनोरंजन, 100 टक्के उपस्थिती आणि 100 टक्के गंमत असंही यात दिसून येतं. हीच तर फॉमिलीची गंमत आहे या नाटकाची ‘फॅमिली आमची, मनोरंजन तुमचं’ ही टॅगलाईन आहे. या फोटोसह सागरनं त्याला कॅप्शन देखील दिलं आहे. त्यामध्ये सागरनं नाटकाचा प्रयोग कधी होणार आहे आणि त्याची वेळ काय आहे, याची देखील माहिती दिली  आहे.

कार्यक्रमाकडे पाठ की छोटा ब्रेक

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह अवघ्या देशानं डोक्यावर घेतले आहे. राजकीय नेत्यांना देखील चला हवा येऊ द्या च्या सेटवर हजेरी लावली आहे. आता या सगळ्यात सागर कारंडेनं एक पोस्ट केली आणि त्याच्या ब्रेकविषयीच्या चर्चा सुरु झाल्या. सागरनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांना वेगवेगळे प्रश्न पडले आहेत. आता सागर ‘चला हवा येऊ द्या’ मधून ब्रेक घेणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र त्यानं याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. सागरचे महिनाभराचे शेड्युल पाहता सागर नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तो ‘चला हवा येऊ द्या’ मधून ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे. आता सागर कारंडे नाटकामुळे व्यस्त असल्यानंही ब्रेक घेऊ शकतो. आता यावर सागर कारंडेनं प्रतिक्रिया देऊन चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांचं निरसन करायला हवं.

इतर बातम्या

Salman Khan| भाईजान लग्न करेना अन् चर्चा काही थांबेना! सलमान आणि सोनाक्षीचा शुभविवाह? मग काय आहे ‘त्या’ फोटोमागचं सत्य?

Allu Arjun | ‘पुष्पा’स्टार अल्लू अर्जुनकडून गेला ‘आइकन’, काय आहे चित्रपट गमावण्याचं कारण, अल्लू अर्जुन सध्या काय करतोय!

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.