Besharam Rang: ‘बेशर्म रंग’ गाण्यावर प्रिया वारियरचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले “मूळ गाण्यापेक्षाही हे सुंदर..”

'बेशर्म रंग' गाण्यावरील 'नॅशनल क्रश'चा व्हिडीओ पाहिलात का? प्रिया वारियरचं नवीन कौशल्य पाहून चाहते थक्क!

Besharam Rang: 'बेशर्म रंग' गाण्यावर प्रिया वारियरचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले मूळ गाण्यापेक्षाही हे सुंदर..
Besharam Rang: 'बेशर्म रंग' गाण्यावर प्रिया वारियरचा Video व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 10:24 AM

मुंबई: अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यातील एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आणि याच भगव्या रंगावरून वाद सुरू झाला. भगव्या रंगाची बिकिनी परिधान करत, बोल्ड दृश्ये देत दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला. यावरून चित्रपटाच्या बहिष्काराची मागणी झाली. या वादादरम्यान आता अभिनेत्री प्रिया वारियरचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. ‘विंक गर्ल’ म्हणून प्रकाशझोतात आलेल्या प्रियाने ‘बेशर्म रंग’ हे गाणं गाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

‘या गाण्याच्या प्रेमाखातर..’ असं कॅप्शन देत प्रियाने हा व्हिडीओ पोस्ट केला. प्रियाचा आवाज आणि ज्या पद्धतीने तिने हे गाणं गायलं, ते पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. प्रियाने गायलेलं गाणं हे मूळ गाण्यापेक्षाही उत्तम असल्याचं मत काही युजर्सनी मांडलंय.

हे सुद्धा वाचा

चित्रपटातील एका दृश्यामुळे प्रिया सोशल मीडियावर रातोरात प्रकाशझोतात आली होती. तिला ‘विंक गर्ल’, ‘नॅशनल क्रश’ असंही नेटकरी म्हणू लागले. प्रियाने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र तिला सर्वाधिक प्रसिद्धी ही तिच्या डोळा मारतानाच्या व्हिडीओमुळेच मिळाली.

शाहरुख, दीपिकाचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जॉन अब्राहमचीही भूमिका आहे. या चित्रपटातून शाहरुख जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. 2018 मध्ये त्याचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. आता पठाणकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.