AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षी ‘या’ 5 अभिनेत्रींनी गाजवला बॉक्स ऑफिस

Year Ender 2023 : 'या' 5 अभिनेत्रींमुळे बॉक्स ऑफिस जमली प्रेक्षकांची गर्दी..., प्रसिद्ध अभिनेत्रींमुळे बॉक्स ऑफिसचे आले चांगले दिवस... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींची चर्चा... जाणून घ्या कोण आहेत 'त्या'?

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षी 'या'  5 अभिनेत्रींनी गाजवला बॉक्स ऑफिस
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 2:46 PM

मुंबई | 31 डिसेंबर 2023 : यंदाच्या वर्षी अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. पण काही मोजक्याच सिनेमांनी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. काही हीट सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. तर काही चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचेल. सांगायचं झालं बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सिनेमा हिट ठरल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. यंदाच्या वर्षी बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. अशाच पाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ…

अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरला. सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. सिनेमामुळे अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.

अभिनेत्री आलिय भट्ट हिच्यासाठी देखील 2023 प्रचंड खास ठरला. अभिनेत्रीच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात घर केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. सिनेमात आलिया हिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकला होता.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री दीपिका पादुकोण वर्षाच्या सुरुवातील ‘पठाण’ सिनेमातील भगव्य बिकीनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. पण ‘पठाण’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचले. ‘पठाण’नंतर ‘जवान’ सिनेमात देखील दीपिका झळकली. दोन्ही सिनेमांमध्ये दीपिका हिने अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत सक्रिन शेअर केली.

अभिनेत्री राणी मुखर्जी हिने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. राणी मुखर्जी स्टारर ‘मसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ सिनेमामुळे एक सत्य घटना प्रेक्षकांच्या समोर आली. आई कशा प्रकारे तिच्या मुलांना पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करते… हे सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिनेमामुळे राणी मुखर्जी तुफान चर्चेत आली.

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, अभिनेत्री, ‘गदर 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि पुन्ही अमिषा पटेल हिच्या नावाची चर्चा रंगू लागली… सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं.