Shocking : अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन, कोरोनामुळे संपली आयुष्याची लढाई

गेल्या अनेक दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.

Shocking : अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन, कोरोनामुळे संपली आयुष्याची लढाई
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 9:53 AM

मुंबई : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) हिचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दिव्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) फेम अभिनेत्री दिव्या गोरेगावच्या एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, दिव्याच्या मृत्यूची माहिती तिचा जिवलग मित्र युवराज रघुवंशी यांनी दिली. युवराजने सांगितलं की, आज सकाळी 3 वाजता दिव्याचा मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास तिची प्रकृती अचानक खालावली. 3 वाजता डॉक्टर जेव्हा तिला तपासण्यासाठी आले तेव्हा तिचं निधन झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्याच्या मृत्यूमुळे तिच्या घरातील आणि जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे.

दिव्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, दिव्याचा नवरा गगन याचा कुठेही पत्ता लागत नाहीये. गगनने माझ्या मुलीची फसवणूक केली आणि तो फरार झाला असं तिने एका अहवालात म्हटलं आहे. त्याने तिला प्रेमात फसवलं आणि सोडून दिलं असा धक्कादायक खुलासा तिच्या आईने केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.