AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता डीजेला हेच वाजणार.. गुलिगत सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ गाण्यावर भन्नाट डान्स

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटातील शीर्षक गीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आता डीजेला हेच वाजणार.. गुलिगत सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' गाण्यावर भन्नाट डान्स
Suraj ChavanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2025 | 12:16 PM

जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘बिग बॉस मराठी सिझन 5’चा विजेता सूरज चव्हाण या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. ज्याला यावर्षीचं पार्टी साँग असंही म्हणता येईल. या गाण्याचा संगीतकार मराठी रॅप आणि हिप-हॉप संगीत बनवणारा मराठमोळा कृणाल घोरपडे ऊर्फ क्रेटेक्स आहे. ‘तांबडी चामडी’ या रॅप साँगच्या तुफान यशानंतर क्रेटेक्स आणखी एक ग्रूव्ही ट्रॅक घेऊन आला आहे. जो पुन्हा एकदा गाण्याच्या तालावर थिरकायला भाग पाडणार आहे. ‘पट्या द डॉक’ने (Patya the Doc) हे गाणं गायलं आहे. तर गीतकार प्रतीक संजय बोरकर आहेत.

या गाण्याविषयी कृणाल विजय घोरपडे (डीजे क्रेटेक्स) आपला आनंद व्यक्त करत म्हणाला, “तांबडी चांबडी गाण्याप्रमाणे, मला खात्री आहे की प्रेक्षकांना माझं हे ‘झापूक झुपूक’ गाणंसुद्धा नक्की आवडेल. माझं काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल मी जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांचा खूप आभारी आहे. ‘झापूक झुपूक’ चित्रपटाच्या या शीर्षक गाण्यात मराठी तडका तर आहेच. पण एक जल्लोष आणि उत्साह आहे जो तरुणांना आणि श्रोत्यांना गाण्याच्या तालावर थिरकायला नक्कीच भाग पाडेल. सामाजिक इव्हेंट्स, क्लब्स आणि पार्ट्यांमध्ये ‘तांबडी चांबडी’प्रमाणेच ‘झापूक झुपूक’ हे गाणंही वाजत या वर्षीचं मराठीतील ‘पार्टी साँग ऑफ द इयर’ ठरण्याची अपेक्षा नाकारता येत नाही. कारण “आता वाजतोय मराठी, गाजतय मराठी, पेटलाय मराठीचा डंका!”

हे सुद्धा वाचा

आकर्षक हुक स्टेप, उत्साही संगीत, कमालीची ऊर्जा आणि उत्तम चित्रीकरणामुळे हे गाणं आणखी रंजक ठरलंय, जे नेहमीच चाहत्यांना लक्षात राहील. याअगोदर सुद्धा निर्माते केदार शिंदे यांना आपल्या चित्रपटातील सुपरहिट गाण्यांसाठी प्रेक्षकांकडून नेहमीच दाद मिळाली आहे आणि आता ‘झापुक झुपूक’मधून ते पुन्हा एकदा चाहत्यांसाठी अनोख्या संगीताची खास भेट घेऊन येत आहेत.

‘झापुक झुपूक’ या चित्रपटात मनोरंजना सोबतच भरपूर काही अनुभवयाला मिळणार आहे. चित्रपटात सूरजसोबत मराठी कलाकार जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे आणि सौ. बेला शिंदे यांचा केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट येत्या 25 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.