Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’च्या वादावर अखेर झी स्टुडिओजकडून स्पष्टीकरण; म्हणाले..

'हर हर महादेव' चित्रपटावरील आरोपांवर झी स्टुडिओजने सोडलं मौन

Har Har Mahadev: 'हर हर महादेव'च्या वादावर अखेर झी स्टुडिओजकडून स्पष्टीकरण; म्हणाले..
फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 7:22 PM

मुंबई: झी स्टुडिओज निर्मित ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांच्यासह विविध संघटनांनी केला आहे. राज्यातील विविध थिएटर्समध्ये चित्रपटाचे चालू असलेले शोज बंद पाडण्यात येत आहेत. आता या सर्व वादावर झी स्टुडिओजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

झी स्टुडिओजची पोस्ट-

‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता. त्यांची मूल्ये हृदयाशी बाळगूनच आपण वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी, त्यांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा, विचारांचा अभ्यास करून, संदर्भ घेऊन आम्ही ‘हर हर महादेव’ची निर्मिती केली आहे,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘आम्हाला विश्वास आहे, छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वीर योध्यांप्रती आम्हाला असलेला आदर सिनेमा पाहणाऱ्यांना नक्कीच पटेल. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे. सामान्य प्रेक्षकांवर झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे. आमचा राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रणालीवर संपूर्ण विश्वास आहे,’ असं स्पष्टीकरण झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्सकडून देण्यात आलं.

दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांचा दावा-

“आपल्याला आतापर्यंत पाठ्यपुस्तकांमध्ये कळलेल्या इतिहासाच्या पलिकडेही असंख्य घटना असतात, ज्या इतिहासकारांनी अनेक बखरींचा अभ्यास करून मांडलेल्या असतात. त्याच प्रसंगांवर आधारीत दृश्य चित्रपटात घेण्यात आली आहेत,” असा दावा अभिजित देशपांडे यांनी केला.

“सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी दिली आहे. ऐतिहासिक चित्रपटांनी प्रसंगांचं परीक्षण कऱण्यासाठी सेन्सॉर बोर्डावर इतिहासकारांचीही नेमणूक असते. त्यांनीही मान्यता दिल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होतो,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.