Eid-Ul-Fitr 2023 : अखेर ईदचा चंद्र दिसला, उद्या भारतात साजरी होणार ईद

जगभरातील मुस्लिम समुदाय रमजानच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी करतात. यामध्ये सेवाभावी कामे केली जातात. यामध्ये गरिबांना अन्नदानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना मिठी मारतात. रोजाचा महिना ईदच्या सणाने संपतो.

Eid-Ul-Fitr 2023 : अखेर ईदचा चंद्र दिसला, उद्या भारतात साजरी होणार ईद
ईद उल फित्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 8:18 PM

मुंबई : सौदी अरेबीयानंतर भारतातही ईदचा चंद्र दिसला आहे, त्यामुळे देशभरात उद्या म्हणजेच 22 एप्रिल रोजी ईद-उल-फित्र (Eid-Ul-Fitr 2023) साजरी होणार आहे. चंद्रदर्शनानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वजण एकमेकांचे अभिनंदन करत आहेत.  चंद्रदर्शनानंतर सौदी अरेबिया आणि आखाती देशांमध्ये ईद साजरी केली जात आहे.  शिया चंद समितीने यासंदर्भात घोषणा केली आहे. समितीने शुक्रवारी ईदचा चंद्र दिसल्याचे सांगितले.  ईद-उल-फित्र हा सण रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. ईद-उल-फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. इस्लामिक कॅलेंडरचा दहावा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

जगभरातील मुस्लिम समुदाय रमजानच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी करतात. यामध्ये सेवाभावी कामे केली जातात. यामध्ये गरिबांना अन्नदानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना मिठी मारतात. रोजाचा महिना ईदच्या सणाने संपतो.

बंधुभावाचे प्रतिक आहे ईद उल फित्र

मुस्लिमांचा हा सण बंधुभावाचे प्रतीक आहे. या दिवशी लोक शांती, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. ईदचा हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिजरी दिनदर्शिकेनुसार ईदची तारीख वर्षानुवर्षे बदलते. हे कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे. यामध्ये चंद्राच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या गतीनुसार दिवस मोजले जातात.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या या दिवशी काय केले जाते

रमजानच्या रोजाच्या शेवटी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत ईद-उल-फित्र साजरी केली जाते. जगभरातील मुस्लिम बांधव हा सण उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात आणि सर्व प्रथम नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जातात. घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. यामध्ये बिर्याणी, कबाब आणि गोड शेवई यांना विशेष महत्त्व आहे. यासोबतच घरातील मोठ्या व्यक्तींकडून लहान मुलांनाही भेटवस्तू दिल्या जातात, ज्याला ईदी म्हणतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.