अर्णव गोस्वामी ‘उसूलों पे चला होगा’; अमृता फडणवीसांकडून पाठराखण

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

अर्णव गोस्वामी 'उसूलों पे चला होगा'; अमृता फडणवीसांकडून पाठराखण
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 11:45 AM

मुंबई : रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्यांच्या घरी पोहोचले असता, गोस्वामी यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात (Anvay naik Suicide case) त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उडी घेतली आहे. अर्णवच्या समर्थानार्थ ट्विट करुन फडणवीस यांनी अर्णवची पाठराखण केली आहे. (Anvay naik Suicide case : Amruta Fadnavis takes stand for Arnab goswami)

रिपब्लिक टिव्हीने अर्णव यांना अटक केल्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे की. “बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!” या ट्विटद्वारे फडणवीस यांनी अर्णव यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अर्णवची पाठराखण करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. देशातील आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे, अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

प्रकाश जावडेकर यांची महाराष्ट्र सरकारवर टीका

मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकाची कारवाई आणीबाणीसारखी आहे. आम्ही या कारवाईचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्विट करुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली. अर्णव गोस्वामी यांच्यावरीलर कारवाई आणीबाणीसारखी असल्याची टीका देखील जावडेकर यांनी साधला. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची निंदा करतो, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण

2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हिडीओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत 26 मे 2020 रोजी सांगितलं होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”

संबंधित बातम्या

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी: प्रकाश जावडेकर

Arnab Goswami Arrest : सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? कंगनाचा शिवसेनेवर हल्लाबोल

पोलीस आजपर्यंत झोपले होते का? अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील बरसले

(Anvay naik Suicide case : Amruta Fadnavis takes stand for Arnab goswami)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.