आशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा आहेत. प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. (Cm Uddhav Thackeray Appeal Asha volunteers)

आशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 10:54 PM

मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने 28 सप्टेंबर 2020 पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.  (Cm Uddhav Thackeray Appeal Asha volunteers)

आशा स्वयंसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वयंसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांना दरमहा 2 हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा 3 हजार  राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.

शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार

या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. या शासननिर्णयानुसार लवकरच त्यांना सर्व मोबदला मिळणार आहे. याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी  नव्याने केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.

माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानात काम करतांना जोपर्यंत कोविड झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होत नाही तो पर्यंत कोविड विरोधातील लढाई आपण पुर्णपणे जिंकणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या मदतीनेच राज्यात ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’  अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या  १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आपल्या आरोग्याची काळजी घेतांना आपणास सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, यांसारखे संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मोहिमेतील माहिती संकलित करण्यासाठी आणि ती भरणे सोयीचे व्हावं यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपमध्ये माहिती भरतांना काही अडचणी आल्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रपत्रात लेखी स्वरूपात माहिती भरण्याची मुभा देखील आपणास दिली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोना नियंत्रणात आशा स्वयंसेविकांचा अमुल्य वाटा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 66 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तर 4 हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वयंसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून नियंत्रण मिळवण्यात अमुल्य वाटा उचलला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. (Cm Uddhav Thackeray Appeal Asha volunteers)

संबंधित बातम्या

ASHA Activists | ‘आशा’ वर्कर्सचे मानधन आता 3 हजार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांकडून मान्य, आशा सेविकांचे मानधन वाढवण्याचा शब्द

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.