दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?
मुंबई : आजकाल व्यस्त शेड्युलमधून प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्य नाही. यामुळे आरोग्य खराब होतं, वजन वाढतं, रक्तदाबासारखे इतर आजार सुरु होतात. सध्या वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण वेळ नसल्याने व्यायाम करता येत नाही आणि डॉक्टरांनी दिलेले पत्तेही पाळता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला काही […]
मुंबई : आजकाल व्यस्त शेड्युलमधून प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्य नाही. यामुळे आरोग्य खराब होतं, वजन वाढतं, रक्तदाबासारखे इतर आजार सुरु होतात. सध्या वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण वेळ नसल्याने व्यायाम करता येत नाही आणि डॉक्टरांनी दिलेले पत्तेही पाळता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्युलमधूनही याचा वापर करुन तुम्ही तुमचे वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता.
वजन वाढल्यामुळे याचा त्रास आपल्या आरोग्यावर होतो. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम, जिमपासून ते डायटवर कंट्रोल करतात. पण काही लोक इतकी मेहनत केल्यानंतरही वजन कमी करु शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत अनेक गोष्टींचा वापर केला असेल. पण आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक साधा सोपा उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमचे वजन आणि आरोग्यही ठीक होऊ शकते.
नारळ पाण्याने वजन कमी करा
गरमीमध्ये अनेक लोक नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळ पाणी शरीरातील विषाक्त तत्व बाहेर काढते. यामुळे तुमचे वजन जलद गतीने वाढते. याशिवाय दररोज तुम्ही नारळ पाणी प्यायलाने वजनही कंट्रोलमध्ये राहते.
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ सकाळची आहे. यासाठी दररोज उपाशी पोटी नारळ पाण्याचे सेवन तुम्ही करु शकता. याशिवाय व्यायाम करताना किंवा व्यायामानंतर, दुपारी जेवणानंतर किंवा संध्याकाळी नारळ पाणी पिऊ शकतात. यामुळे तुमचे वजन कमी होते आणि शरीराला उर्जाही मिळते.
नारळ पाणी पिण्याचे फायदे
- सकाळी रोज नारळ पाणी पिल्याने संपूर्ण दिवस शरीरात एनर्जी राहते आणि यामुळे रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता. जर तुमचे वजन वाढले असेल, तर नारळ पाणी तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. प्रोटीन, खनिज आणि कॅल्शियम यामध्ये भरपूर असते. हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असते.
- नारळ पाणी पिल्याने तुम्हाला दिवसभर भूख लागत नाही आणि तुम्ही ओव्हरइटिंगमुळे वाचू शकतात. यामुळे तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी इच्छुक आहात, तर सकाळी व्यायामानंतर, दुपारी जेवल्यानतंर आणि संध्याकाळी नारळ पाणी पिऊ शकतात.
- वजन घटवण्यासोबत नारळ पाण्याचे सेवन थायरॉड हार्मोन्स संतुलित ठेवते. यासाठी तुम्ही सकाळी नारळ पाणी पिऊ शकता. कीडनीच्या आरोग्यासाठीही नारळ पाणी फायदेशीर आहे. हे युरीनरी ट्रॅकला साफ करुन किडनी स्टोनही काढून टाकते.
- याशिवाय नारळ पाण्यामुळे तुम्हाला किडीनी स्टोनही होणार नाही. गरमीमध्ये नारळ पाण्याचे सेवन तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवते. तसेच त्वचेला पोषण देण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर आहे.