पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल : गुलाबराव पाटील

शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे आज दुपारी जळगावात होते. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना त्यांनी पत्रकारांशी बातचित केली.

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल : गुलाबराव पाटील
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 4:59 PM

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. (Gulabrao Patil says Pankaja Munde should join Shiv Sena then politics will change)

गुलाबराव पाटील हे आज दुपारी जळगावात होते. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणावर होणारे दूरगामी परिणाम, भाजप नेत्या पंकजा मुंडे, बिहार विधानसभा निवडणूक अशा विविध विषयांवर मते मांडली.

गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मुंडे परिवाराशी जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध राहिले आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप-सेनेत युती घडवून आणली होती. 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे भाजपच्या उमेदवार होत्या. तेव्हा शिवसेनेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. युती असतानाही आणि युती नसतानाही शिवसेनेने मुंडे कुटुंबासोबतचे नाते जोपासले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंप्रमाणे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला पाहीजे, म्हणजे राजकारणात मजा येईल.

एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश, नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!

गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

Eknath Khadse Live Update | खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला 11 दिग्गजांची उपस्थिती

एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल; भाजपचा पलटवार

दिल्लीतल्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही, तुम्ही राष्ट्रवादीत जा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

(Gulabrao Patil says Pankaja Munde should join Shiv Sena then politics will change)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.