Jayant Patil | ताकद काय असते हे दाखवायला जळगावमध्ये जावं लागेल : जयंत पाटील

"जळगावमध्ये ताकद काय असते हे दाखवायला जळगावात जावं लागणार आहे", असं म्हणत त्यांनी टीका केली

Jayant Patil | ताकद काय असते हे दाखवायला जळगावमध्ये जावं लागेल : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 4:43 PM

मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Jayant Patil Criticize BJP) प्रवेश घेतला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंनी पक्ष प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर नाव न घेता अनेक टोले हाणले. “जळगावमध्ये ताकद काय असते हे दाखवायला जळगावात जावं लागणार आहे”, असं म्हणत त्यांनी टीका केली (Jayant Patil Criticize BJP).

“लवकरच जळगावला जावं लागणार आहे. फिजीकल डिस्टन्सिंगचे निर्बंध हटले की जळगावमध्ये ताकद काय असते हे दाखवायला जावं लागणार आहे”, असं ते म्हणाले.

एकनाथ खडसे यांना शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात आजपर्यंत कधीही सुडाचं राजकारण झालं नाही. आपल्या राज्याची तशी संस्कृती नाही. शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवलं. मात्र, महाराष्ट्रात मागील 4-5 वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

एकनाथ खडसेंनी विधीमंडळाचा सदस्य काय करु शकतो, हे दाखवून दिलं. त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून ताकदही आम्ही पाहिली. खडसेंचा एक दिग्गज नेता मंत्री झाला, मात्र पहिल्या रांगेतील नेत्याला सभागृहातील मागच्या रांगेत बसवण्याचं काम भाजपमध्ये झालं. खडसेंवरील अन्यायावर सभागृहात सर्वात जास्त मीच बोललो. कटप्पाने बाहुबली को क्यु मारा असा प्रश्न मी विचारला, पण त्याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही.आजही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आजही ते टीव्ही पाहात असतील. आज त्यांना कळालं असेल की ‘टायगर अभी जिंदा है’, ‘पिक्चर अभी बाकी है’ हे आता त्यांना कळेल, असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला (Jayant Patil Criticize BJP).

शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवलं. मात्र, महाराष्ट्रात मागील 4-5 वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं.

लोकसभेत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणूक आली. शरद पवार यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या संस्था उभ्या केल्या, कार्यकर्ते घडवले असे मोठे मोठे लोक आम्हाला सोडून गेले. मात्र, महाराष्ट्राची जनता शद पवार यांचाच विचार स्वीकारेल यावर आमचा विश्वास होता.

शरद पवार यांना ईडीची नोटीस देण्यापर्यंत मजल केली. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः ईडीच्या कार्यालयाला भेट दिली. 79 वर्षांचा हा नेता संपूर्ण महाराष्ट्रात फिरला आणि सत्ताबदल केला.

महाराष्ट्रात जिथं अतिवृष्टी झाली तेथे मदतीसाठी स्वतः शरद पवार केले. त्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज आमच्या सरकारने घोषित केलं आहे. केंद्र सरकारने नुकतेच काही कायदे केले यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत राहणार की नाही अशी भिती तयार झाली आहे. महाराष्ट्रातील कायद्यांमध्ये देखील बदल झाले आहे. 300 पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांमध्ये कामगारांना कधीही काढून टाकलं जाणार आहे.

दिल्लीवरुन उद्योगधार्जिणे काम सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शेतकरी आणि कामगार याविरोधात ताकदीने एकत्र होईल. यासाठी राष्ट्रवादी मजबूत करणं गरजेचं आहे.

राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचं कुटुंब आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणारा त्यांच्या दुःखात उभा राहणारा पक्ष आहे. आमचा पक्ष लहान होता, पण तो पक्ष वाढला तो फक्त शरद पवार यांच्या स्वभावामुळे.

महाराष्ट्रात कुठेही संकट आलं तरी शेतकरी शरद पवार मदतीला येतील या आशेवर असतो. इतकंच काय तर देशातील शेतकरी देखील त्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांकडे येतात. 1998-99 ला सरकार आलं तेव्हा आमच्या पक्षात अनेक नेते असताना देखील आर. आर. पाटील यांच्यासह अनिल देशमुख, अजित पवार, मी अशा अनेक नव्या तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली.

बराच काळ उलटून गेलाय, आज आमच्या नंतरची पीढी देखील राजकारणात सक्रिय आहे. आज एकनाथ खडसे यांचं कुटुंबासारख्या पक्षात प्रवेश होत आहे. या पक्षात शरद पवार सांगतील तोच आमच्या सर्वांसाठी अंतिम शब्द आहे. कितीही संकट असलं तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करत आहेत.

एकनाथ खडसेंना त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत न्याय करेल असं वाटत होतं. मात्र, तसं झालं नाही. त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंसह पक्ष वाढवला आहे.

Jayant Patil Criticize BJP

संबंधित बातम्या :

खडसेंनी अजून काही मागितले नाही, आम्हीही चर्चा केलेली नाही; जयंत पाटलांची सावध प्रतिक्रिया

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.