SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा धडाका; पाच शानदार कार लाँच होणार
मारुती सुझुकी इंडियाने आगामी काळात नवीन स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) मॉडेल्स लाँच करण्याचा प्लॅन केला आहे.
मुंबई : मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) आगामी काळात नवीन स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) मॉडेल लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी त्यांच्या इतर प्रोडक्ट्सपासून एसयूव्ही सेगमेंट वेगळं करणार आहे. 2021 ते 2023 पर्यंत कंपनी पाच नव्या एसयूव्ही लाँच करणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मारुती कंपनी मार्केटमध्ये गियर बदलणार आहे. लोकांच्या पसंतीचा विचार करुन नव्या कार आम्ही मार्केटमध्ये आणणार आहोत. (Maruti Suzuki making big entry in SUV market, will launch 5 new cars)
कंपनी टोयोटा सुझुकीसोबत पार्टनरशिप करुन नवे मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या मॉडेलवर टोयोटाचा बॅज लावलेला असेल. त्यानंतर 2022 च्या पहिल्या सहामाहीत नवीन विटारा ब्रेजा लाँच केली जाणार आहे. तर दुसऱ्या सहामाहीत एक मिड साईज एसयूव्ही लाँच केली जाणार आहे. ही नवी कार ह्युंदाई क्रेटा आणि केएल सोनेटला टक्कर देईल.
टाटा नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी एक मॉडेल बनवलं जात असतून ती कार 2022 मध्ये लाँच केली जाणार आहे. मारुतीचे संस्थापक अविक चट्टोपाध्याय म्हणाले की, मारुतीची ब्रॅण्ड रणनीति कंपनीच्या प्रोडक्ट रणनीतिपेक्षा वेगळी असेल. प्रत्येक एसयूव्हीच्या किंमतीत फरक असेल.
सध्या भारतासह जगभरात एसयूव्हीला मागणी वाढत आहे. मजबुती आणि रुबाबदार लुक्समुळे लोक एसयूव्हीकडे आकर्षित होत आहेत. यंदा एका वर्षात ज्या नव्या कार लाँच करण्यात आल्या, त्यापैकी अर्ध्याहून अधिक कार या एसयूव्ही आहेत. या कार्सना मोठी मागणी आहे. त्यामुळे सर्व कंपन्या आगामी काळात नवनव्या एसयूव्ही लाँच करण्याचा मार्गावर आहेत.
मार्केटची परिस्थिती पाहून मारुतीनेदेखील नव्या एसयूव्ही कार्सची निर्मिती करण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनी आगामी काळात पाच नव्या एसयूव्ही लाँच करणार आहे. Maruti Suzuki S-Cross आणि Maruti Suzuki Vitara Brezza या दोन कार्सनादेखील सध्या वाढती मागणी आहे.
संबंधित बातम्या
(Maruti Suzuki making big entry in SUV market, will launch 5 new cars)