दीड वर्षाच्या बाळापासून दूर राहून नर्सची 14 दिवस रुग्णसेवा, कोरोनाच्या लढाईत योगदान
नागपुरातील एका नर्सने देखील आपला दीड वर्षांचा मुलगा घरी ठेऊन सलग 14 दिवस रुग्णसेवा केली. मात्र, घरी पोहचून आपल्या बाळाला बघताच त्यांचे अश्रू अनावर झाले (Nagpur mother nurse work without baby).
नागपूर : कोरोनाच्या लढाईत अनेकजण आपआपल्या परीनं योगदान देत आहेत. नागपुरातील एका नर्सने देखील आपला दीड वर्षांचा मुलगा घरी ठेऊन सलग 14 दिवस रुग्णसेवा केली. मात्र, घरी पोहचून आपल्या बाळाला बघताच त्यांचे अश्रू अनावर झाले (Nagpur mother nurse work without baby). मोनिका खांडेकर असं या महिला कोरोना योध्यांचं नाव आहे. त्या नागपूरच्या मेयो रुग्णालयात नर्स आहेत. मोनिका यांना दीड वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे.
आपलं कर्तव्य निभावण्यासाठी त्यांना 14 दिवस सलगपणे कामावर जायचं होतं. त्याचवेळी त्यांच्या डोळ्यासमोर मातृत्व आणि छोटंस बाळही येत होतं. दीड वर्षाचं बाळ आई विना कसं राहील हा प्रश्न घरच्यांना सुद्धा पडला. मात्र, ममता यांनी आपला निर्धार पक्का केला आणि आपल्या बाळापासून दूर कोरोनाच्या रुग्णांना सेवा दिली. अनेक रुग्णांना कोरोनाशी सामना करण्यासाठी मदत केली. मुलगी 4 वर्षाची असल्याने तिला समज दिली, पण अंगावरच दूध पिणारं बाळ असतानाही त्याची चिंता न करता त्यांनी आपल्या कर्तव्यात कुठलीही कसर ठेवली नाही. सलग 14 दिवस त्यांनी अविरतपणे आपली जबाबदारी पार पाडली. संकट काळात कर्तव्य महत्वाचं असल्याने आपण बाळाची चिंता न करता हे काम केल्याचं त्यांनी सांगितलं.
या सगळ्यात ममता यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांच्या या कार्याचं महत्त्व लक्षात घेत बाळाची जबाबदारी घेतली. बाळाची चिंता करु नकोस, आम्ही त्याला सांभाळू, असा विश्वास दिला आणि त्यांच्या कर्तव्याचा सन्मान केला. ममता यांच्याप्रमाणेच इतरही अनेक महिला योद्धा आपलं योगदान देत आहेत. आईला आपल्या बाळाच्या समोर काहीच दिसत नाही. आई बाळासाठी कशाचाही त्याग करते. मात्र, इथं या आईने आपल्या बाळासोबतच कर्तव्यालाही प्राधान्य दिल्यानं ममता यांचं कौतुक होत आहे. ममता यांच्या उदाहरणातून देशासाठी आपलं कर्तव्य बजावायचं असेल तर हीच आई पुढे येऊन कर्तव्य पार पाडते हे दिसून आलं आहे. त्यांच्या कर्तव्याला टीव्ही 9 चा सलाम.
संबंधित बातम्या :
सिंधुदुर्गात पहिला कोरोना मृत्यू, जिल्ह्यात बोगस पासचा मुद्दाही ऐरणीवर
राज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करा : काँग्रेस नेते आशिष देशमुख
APMC मार्केटमधील 12 सुरक्षारक्षक कोरोनाबाधित, प्रशासनाकडून खासगी बाऊन्सर
Nagpur mother nurse work without baby