मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर
मुंबईत कोरोनाबाधिताचा तिसरा बळी गेला आहे. मूळचा फिलिपिन्सचा असलेल्या नागरिकाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत (Philippines Corona Patient Dies) असून मुख्यमंत्र्यांच्या भाषेत तो गुणाकार करताना दिसत आहे. कारण मुंबईत कोरोनाबाधिताचा तिसरा बळी गेला आहे. मूळचा फिलिपिन्सचा असलेल्या नागरिकाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाल्याने आता देशातील मृतांचा आकडा आता 7 वर येऊन पोहोचला (Philippines Corona Patient Dies) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही 68 वर्षीय फिलिपिन्सची नागरिक असल्याची माहिती आहे.
A 68-year-old Philippines citizen, initially tested positive for #COVD19 but subsequently became negative, passed away yesterday. He was shifted from Kasturba hospital to a pvt hospital. He had developed acute renal failure&respiratory distress: Public Health Department, #Mumbai
— ANI (@ANI) March 23, 2020
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या व्यक्तीने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केल्याचं समोर आलं आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला.
हेही वाचा : कोरोनाचा विळखा : 24 तासात कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 वरुन 89 वर
ही व्यक्ती एका धार्मिक कार्यक्रमासाठी फिलिपिन्सहून 10 जणांच्या गटासह मुंबईत आली होती. ते सर्वात अगोदर मुंबईत आले. त्यानंतर ते नवी मुंबईत गेले आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून दिल्लीला गेले. विशेष म्हणजे त्यानंतर ते दिल्लीतून पुन्हा मुंबईत आले आणि नवी मुंबईतील वाशी येथे गेले.
तिथे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना उपचारासाठी थेट कस्तुरबा रुग्णालयात हलवलं. कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.
फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास
- 3 मार्च – फिलिपिन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांना गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली.
- 5 मार्च – फिलिपिन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला.
- 6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली
- 7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला
- 10 मार्च – रेल्वे मार्ग हा गट दिल्लीतून (Philippines Corona Patient Dies) मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला
- 10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 68 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले
- 12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं
- 13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या
- 14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं
- 17 मार्च – 68 वर्षीय बाधिताची प्रकृती खालावली असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं
24 तासात कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये 15 नव्या रुग्णांची वाढ
त्यासोबतच कोरोनाच्या गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 39 पुणे – 16 पिंपरी चिंचवड – 12 नागपूर – 4 यवतमाळ – 4 कल्याण – 4 नवी मुंबई – 3 अहमदनगर – 2 पनवेल – 1 ठाणे -1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 उल्हासनगर – 1 एकूण 89
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबईत (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई महिला (1) – 19 मार्च उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च एकूण – 89 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
- कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
- दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
- मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
- पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
- महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
- पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
- मुंबई – 68 वर्षीय फिलिपिन्सची नागरिकाचा मृत्यू (1) – 23 मार्च
- एकूण – 7 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
Philippines Corona Patient Dies
संबंधित बातम्या :
आई दवाखान्यात, महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात, जयंत पाटलांकडून राजेश टोपेंचं आगळंवेगळं कौतुक
कोरोनाला रोखण्यासाठी देश सज्ज, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन
पुण्यात ‘कोरोना’च्या समूह संसर्गाचा धोका वाढला, परदेशी न जाताच महिलेला लागण, चार नातेवाईकही बाधित