पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, शिवसेना महिला आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी

पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, शिवसेना महिला आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 8:34 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस दलात सुमारे 2 लाख 22 हजार पोलीस आहेत. त्यामध्ये केवळ 29 हजार महिला पोलिस आहेत. खरं तर 33 % आरक्षण गृहीत धरले तर सुमारे 70 हजाराच्यावर महिला पोलीस असणे आवश्यक आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. (Recruit 33 percent women police in the police force Demand Shivsena MLA Manisha Kayande)

महिलांवर होणारे अत्याचार तसेच महिलांचे इतर प्रलंबित प्रश्न घेऊन काल सह्याद्री अतिथिगृह येथे महिला सुरक्षितता आणि दिशा कायदा यासंबंधी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गृहमंत्री अनिल देशमुख तसेच गृहराज्य मंत्री सतेज पाटील व शंभूराजे देसाई यांना भेटलं.

आमदार कायंदे यांच्या निवेदनावर गृहमंत्री देशमुख म्हणाले, नवीन 12 हजार पोलिसांची भरती होणार आहे यामध्ये महिलांची संख्या 33 टक्के होईलच याची आम्ही काळजी घेऊ व इतर मागण्यांवर आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करू”

सामान्य महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते त्यावेळेस तेथे तक्रार नोंदवण्यासाठी महिला पोलीस असणे व्यथा मांडण्यासाठी अधिक सोयीस्कर होते. पुरुष अधिकाऱ्यांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडणे खूप कठीण जातं आणि महिला आणि पुरुष यामधील संवेदनशीलता पाहिली तर निश्चितच महिलांमध्ये संवेदनशीलता अधिक असते हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे पोलिस दलात अधिकाधिक महिला असणं आवश्यक आहे, असं कायंदे म्हणाल्या.

महिला पोलिसांच्या सोयीसुविधा त्यांच्या कामाच्या वेळा व त्यांच्यासाठी असलेले शौचालय याचीदेखील कमतरता आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो. पोलिसांसाठी फिरती शौचालय असण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सुमारे आठ ते दहा महिन्यापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. हे तातडीने भरण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी गृहमंत्र्यांकडे केले.

तसेच विभागीय स्तरावर महिला आयोग कार्यालय असणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून महिलांना तिथे आपली व्यथा मांडणे अधिक सोयीस्कर होईल आणि असा निर्णय देखील सरकारचा झालेला आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. महिला पोलिसांना समुपदेशन करण्याच्या पद्धती किंवा समुपदेशन कसे करावे याबाबत विशेष ट्रेनिंग देण्याची गरज आहे, असेही कायंदे यांनी म्हटले. (Recruit 33 percent women police in the police force Demand Shivsena MLA Manisha Kayande)

संबंधित बातम्या

दानवे म्हणाले, हे सरकार अमर अकबर अँथोनीचं, गृहमंत्र्यांचंही शायराना अंदाजात प्रत्युत्तर

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? :अनिल देशमुख

सुशांतप्रकरण भाजपकडून हाइप; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.