योगी सरकारनं अयोध्या विमानतळाचं नाव बदललं, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असं नामकरण
उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अयोध्यात तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव 'मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ' असं असणार आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अयोध्यात तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ’ असं असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (24 नोव्हेंबर) कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या विमानतळाचं काम सुरु असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे (Uttar Pradesh cabinet rename the Ayodhya airport as Maryada Purushottam Sriram airport).
अयोध्येतील हे विमानतळ उत्तर प्रदेशमधील पाचवं आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. बुद्धांची जडणघडणीत महत्त्वाचं स्थान असलेल्या कुशीनगर आणि जेवरमध्ये देखील अशाचप्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे.
Uttar Pradesh Cabinet clears proposal to rename the Ayodhya airport as Maryada Purushottam Sri Ram Airport, Ayodhya.
— ANI UP (@ANINewsUP) November 24, 2020
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादविरोधातही (Love Jihad) अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचं नाव ‘बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020’ असं आहे. योगी सरकारच्या कॅबिनेटने आज (24 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत लव जिहादसह 21 प्रस्तावांना मंजूरी दिली आहे. या नव्या कायद्यात लव जिहाद प्रकरणांमध्ये पीडितेला आर्थिक मदतीची आणि दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आंतरधर्मीय विवाहाबाबत हा कायदा आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार आता आंतरधर्मीय विवाहासाठी 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही तरुणाने आपलं नाव लपवून लग्न केलं तर त्याला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट बैठकीची माहिती देताना सांगितलं, “राज्यात सातत्याने लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना फसवून लग्न केलं जात आहे. तसेच त्यांचं धर्मांतरण केलं जात आहे. हे रोखण्यासाठी नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.”
या नव्या कायद्यानुसार नाव आणि धर्म लपवून लग्न करणे आणि फसवणूक करण्यावर आळा बसेल, असा दावा मौर्या यांनी केलाय. जबरदस्तीने धर्मांतरण करणं चुकीचं आहे आणि आता या कायद्याप्रमाणे अशा दोषींवर कारवाई होईल, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका
Uttar Pradesh cabinet rename the Ayodhya airport as Maryada Purushottam Sriram airport