राहुल तेवतियाचे 5 षटकार, सिक्सर किंगही चक्रावला, युवराज सिंह म्हणतो, ना भाई ना!

राजस्थानच्या राहुल तेवतियाच्या खेळीने सिक्सरकिंग युवराज सिंगला देखील धडकी भरली. (Yuvraj Singh Tweet On Rahul Tewatia Rocking Innings)

राहुल तेवतियाचे 5 षटकार, सिक्सर किंगही चक्रावला, युवराज सिंह म्हणतो, ना भाई ना!
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 6:37 PM

मुंबई : राजस्थानच्या राहुल तेवतियाने पंजाबविरूद्ध अफलातून खेळी केली. त्याने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार लगावल्याने राजस्थानने सामन्यात कमबॅक करत पंजाबवर अधिराज्य गाजवलं आणि 4 विकेट्सने हा सामना जिंकला. त्यानंतर राहुलचं सर्वत्र कौतुक झालं. त्याच्या खेळीने अनेक जण भारावले. भारताचा सिक्सरकिंग युवराज सिंहला देखील त्याच्या खेळीने धडकी भरली. (Yuvraj Singh Tweet On Rahul Tewatia Rocking Innings)

राहुल तेवतियाने पंजाबविरूद्ध खेळताना अवघ्या 31 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीने तुफानी 53 धावा केल्या. त्याने निर्णायक क्षणी 18 व्या ओव्हरमध्ये शेल्डॉन कॉट्रेलच्या बोलिंगवर 5 बॉलवर 5 सिक्स ठोकले. या फटकेबाजीमुळे सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. त्याच्या या गगनचुंबी षटकारांनी युवराज सिंह देखील अवाक झाला. “ना… भाई ना… एक बॉल मिस केल्याबद्दल आभारी आहे”, असं ट्विट युवराज सिंहने केलं.

“ना भाई ना… एक बॉल मिस केल्याबद्दल थँक्यू… काय खेळलास तू…. रोमहर्षक विजयाबद्दल राजस्थान रॉयल्सचं अभिनंदन”, असं युवराजने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर त्याचवेळी पंजाबच्या मयांकच्या झुंझार खेळीचं देखील युवराजने कौतुक केलं आहे. मयांक भारी खेळलास तर संजूचा खेळ अप्रतिम, असंही युवराजने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

राहुलची पंजाबविरूद्ध धमाकेदार इनिंग

पंजाबविरूद्ध खेळताना तेवतियाने अवघ्या 31 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीने तुफानी 53 धावा केल्या. त्याच्या या खेळीने राजस्थानने पंजाबचा 4 विकेट्सने पराभव केला. तेवतियाने निर्णायक क्षणी 18 व्या ओव्हरमध्ये शेल्डॉन कॉट्रेलच्या बोलिंगवर 5 बॉलवर 5 सिक्स ठोकले. या फटकेबाजीमुळे सामना राजस्थानच्या बाजूने झुकला.

षटकारांचा बादशहा राहुल तेवतिया टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये राहुलचा स्ट्राईक रेट 153 एवढा आहे. त्याचमुळे राजस्थान संघाने त्याच्यावर भरोसा दाखवत त्याला नंबर 4 वर खेळण्याची संधी दिली. राजस्थानचा प्रमुख फलंदाज संजु सॅमसनने सांगितलं की, “नेट्समध्ये सराव करताना राहुल खूप सिक्सर लगावतो. हीच बाब लक्षात घेता टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास दाखवला. जर तो क्रीजवर टिकला तर भल्याभल्या गोलंदाजांना तो सळो की पळो करून सोडेन, असा विश्वास राजस्थानच्या टीम मॅनेजमेंटला होता. तोच विश्वास राहुलने सार्थ करून दाखवला.”

(Yuvraj Singh Tweet On Rahul Tewatia Rocking Innings)

संबंधित बातम्या

Rahul Tewatia | 3 कोटीचा खेळाडू, 5 षटकार, सामना पलटवणाऱ्या राहुल तेवतियाची पार्श्वभूमी काय?

IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.